• Home
  • संचालक मंडळ
  • ज.रा.चंडक बालक मंदिर
  • ल. कि. प्राथ.शाळा
  • स.हि.ने.प्रशाला.

*'एक समृद्ध शैक्षणिक परंपरा'*

 'एक समृद्ध शैक्षणिक परंपरा'
               ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्यावर बंधने होती त्या काळात स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, स्त्रियांच्या विकासाचा ध्यास घेणारी *श्री सरस्वती मंदिर* ही जुनी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्था आहे. स्वातंत्र्योत्तर काळात विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत स्त्रियांच्या उद्धाराचा आणि विकासाचा पुरोगामी विचार घेऊन श्री सरस्वती मंदिरची स्थापना झाली. 
               स्त्रियांच्या उद्धाराचा आणि आणि विकासाचा त्याकाळात पुरोगामी समजला जाणारा दूरदृष्टीचा विचार शंभर वर्षापूर्वी सोलापुरातील सुधारकांना सुचला. आणि त्याची परिणती म्हणून 27 सप्टेंबर 1895 रोजी श्री सरस्वती मंदिर ही संस्था स्थापन झाली. स्त्रियांना शिकून-सवरून शहाणे करणे आणि त्यांचे कल्याण करणे या व्यापक उद्देशाने संस्थेने शंभर वर्षांपूर्वी जेव्हा या कामास प्रारंभ केला तेंव्हा,सर्वतोपरी प्रतिकूल परिस्थिती होती.अशा परिस्थितीत श्री सरस्वती मंदिर संस्थेने आपल्या कार्यास प्रारंभ केला.
               सुधारकांचे प्रतिनिधी लोकहितवादी यांचे चिरंजीव त्यावेळी सोलापूर चे कलेक्टर होते श्री.लक्ष्मणराव देशमुख यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई देशमुख यांच्या हस्ते संस्थेची स्थापना झाली. प्रारंभी सौ. लक्ष्मीबाई किर्लोस्कर,सौ. काशीबाई कानिटकर वगैरे स्त्रिया सौ. लक्ष्मीबाई देशमुख यांच्याकडे जमत असत. आणि खेळ खेळत असत. त्यातून एक क्लब स्थापन झाला आणि पुढे त्याचे रूपांतर शाळेमध्ये झाले. 5ऑक्टोबर 1895 रोजी शाळा स्थापनेचा समारंभ श्री शंकरराव देगावकर यांच्या वाड्यात झाला. त्यावेळी सौ. लक्ष्मीबाई देशमुख यांनी भाषण करून संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. संस्थेचे नाव सरस्वती मंदिर असे ठेवण्यात आले.
               संस्थेचे नियम आणि उद्दिष्ट ठरविण्यासाठी तीन चार ठिकाणी मोहल्ल्यातून सभा घेण्यात आल्या. संस्थेने स्त्रियांची सर्वांगीण सुधारणा हे ध्येय ठरविले. सर्व प्रकारच्या शिक्षणाचा त्यात अंतर्भाव होता. या सदनाची अंतर्गत व्यवस्था पाहण्यासाठी स्त्रियांची एक कार्यकारी समिती नेमण्यात आली.
               कार्यकारी मंडळात स्त्रिया आणि सल्लागार समितीत पुरुष अशी विभागणी करून समिती स्थापन करण्यात आली. त्यात राणीसाहेब, संस्थान अक्कलकोट या अध्यक्ष होत्या. सौ. लक्ष्मीबाई देशमुख उपाध्यक्ष तर सौ. लक्ष्मीबाई किर्लोस्कर ,सौ. मालतीबाई केसकर आणि सौ. आंबा सेठना या सेक्रेटरी म्हणून काम पाहत असत. बाह्य व्यवस्था पाहण्यासाठी सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून तत्कालीन कलेक्टर श्री. लक्ष्मणराव उर्फ आप्पासाहेब देशमुख तर उपाध्यक्ष म्हणून श्री. आप्पासाहेब वारद होते. सेक्रेटरीच्या पदासाठी श्री. प्रभाकर नागपूरकर वकील,डॉ.वा.का. किर्लोस्कर आणि श्री. शंकरराव देगावकर यांची निवड करण्यात आली.
               दर शुक्रवारी मंदिर मध्ये स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ होत असे. या समारंभाच्या निमित्ताने जमलेल्या स्त्रियांना विद्वान पुरोगामी लोकांनी लिहिलेले निबंध वाचून दाखवण्यात येत असत.त्यामुळे स्त्रिया निरक्षर असल्या तरी त्यांचा नव्या विचारांशी परिचय होत असे. या उपक्रमाचा फायदा स्त्री संघटना निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला. स्रियांनी साक्षर व्हावे,शिक्षण घ्यावे. यासाठी स्कॉलरशिप्सही ठेवण्यात आल्या होत्या.त्यामुळे स्त्री शिक्षण वाढण्यास मदत झाली.
               प्रौढ स्त्रियां बरोबरच भावी सुगृहिणी बनणाऱ्या बालिकांना शिक्षण देण्याच्या कल्पनेस मूर्त स्वरुप आणण्यासाठी मदत म्हणून सौ. लक्ष्मीबाई किर्लोस्कर आदी भगिनीनी सोलापुरात घरोघरी फिरून संस्थेच्या भिक्षेच्या झोळीत धान्य जमा केले. यामुळे संस्थेत मुलींच्या भोजनाची व निवासाची सोय झाली. गावातील अनेक लोकांच्या मदतीमुळे मंदिराच्या जागेत चार खोल्या एक लहानसा हाॅल बांधून पटांगणात बाग केली. या खोल्यातून विद्यार्थिनी राहात व त्यांचे वर्गही तिथेच भरत. श्री बालाजी भास्कर जोशी आणि सौ रमाबाई जोशी हे पती-पत्नी मंदिरात राहणाऱ्या विद्यार्थिनींची सर्व व्यवस्था पहात  आणि त्यांना शिकवित. मुलींच्या शिक्षणास असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पालक आपल्या मुली शाळेत पाठवण्यास तयार नसत. मुलींच्या शिक्षणाबाबत समाजाचे अनुकूल मत व्हावे आणि आणि मुलींच्या पालकांचेही ही शिक्षणाबाबत असे आकर्षण वाढावे यासाठी मंदिर च्या कार्यकर्त्यांनी मुलींच्या भोजनाची आणि निवासाची ची सोय केली होती. मराठी चौथीपर्यंत अभ्यासक्रम त्यांना शिकवण्यात येईल.
                शाळेखेरीज संस्थेमध्ये वाचनालय चालविले जाई. जिल्हा वाचनालयातून पुस्तके वर्तमानपत्रे व मासिके मंदिरातील स्त्री सभासदांकरीता करता मुद्दाम आणीत असत.पुढे स्वतःचे वाचनालय पुस्तके खरेदी करून चालू करण्यात आले. प्रौढ व विवाहित स्त्रियांना घर कामामुळे वेळच्या वेळी शाळेत जाता येत नसे . म्हणून त्यांच्यासाठी अनियमित वर्गाची सुविधा करून त्यांना त्यांच्या सोयीनुसार अभ्यासक्रमापैकी भाषा गणित इतिहास इत्यादी विषय मंदिरात शिकवण्यात येत.याव्यतिरिक्त शिवणकाम विणकाम, पेटी वादन वगैरेचे वर्गही ही चालविले जात होते. मंदिर मध्ये दाईचा कोर्सही सुरू करण्यात आला होता. स्त्रियांना व मुलींना उपयुक्त अशा विषयांवरची व्याख्याने आयोजित करण्यात येत असत. व्याख्याते म्हणून विद्वानांना पाचारण करण्यात येत असे. वटसावित्री, संक्रांत नागपंचमी या दिवशी काही कार्यक्रम व हळदीकुंकू होत असे. संक्रांतीला हलव्याचे आणि कला कौशल्याचे प्रदर्शन केले जाई. समारंभास सोलापुरातील स्त्रिया बहुसंख्येने उपस्थित असत स्त्रियांसाठी सामाजिक कार्य करणारी संस्था या नावाला पात्र असे मंदिराचे कार्य सुरू झाले होते.
                संस्थेला स्वतःची मोठी इमारत हवी होती. शेठ हिराचंद नेमचंद जोशी यांनी 1930 मध्ये हे संस्थेला देणगी दिली. त्यामुळे संस्थेची पहिली इमारत बांधून पूर्ण झाली. आणि सखुबाई हिराचंद नेमचंद कन्या प्रशाला असे नाव शेठजींच्या इच्छेनुसार देण्यात आले.
                प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलींच्या पुढील शिक्षणाची ची सोय व्हावी म्हणून 1935 मध्ये मुलींचे हायस्कूल काढण्यात आले .1934 साली लहान बालकांच्या शिक्षणाचा प्रयोग याच शाळेने प्रथम केला. हा बालवर्ग उत्तम चालला 1965 मध्ये बाल वर्गाचे रूपांतर पूर्व प्राथमिक वर्गामध्ये करण्यात आले तसेच संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात स्त्रियांची गरज म्हणून एक वर्षाचा अभ्यासक्रम असलेला शिवण वर्ग चालू करण्यात आला. अशाप्रकारे श्री सरस्वती मंदिर च्या पूर्वप्राथमिक, प्राथमिक,माध्यमिक शाळा आणि शिवण वर्ग अशा चार शाखा कार्यान्वित झाल्या. त्यामध्ये शतक महोत्सवी वर्षात स्त्रियांच्या व्यक्तिमत्व उन्नतीसाठी स्त्री व्यक्तिमत्व विकास केंद्र या या पाचव्या शाखेची भर पडली.
रामसुख संतोकीराम चंडक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून आलेल्या पंचवीस हजार रुपयाच्या देणगीतून तीन ते पाच वर्षे वयाच्या मुला मुलींकरिता एक जुलै 1965 रोजी सरस्वती मंदिर संस्थेच्या शाळेत जोडून जडावबाई रामसुख चांडक बालक मंदिर चालू करण्यात आले. संवाद साधणे, गोष्टी सांगणे,माहिती सांगणे, हातांनी काम करणे, ज्ञानेंद्रियांना अनुभव देणे, भाषेचा योग्य वापर करणे, खेळणे, गाणी म्हणणे,नाचणे इत्यादी विविध कृतींचे आयोजन केले जाते. विविध स्पर्धांतून भाग घेता यावा आणि अंगी सभाधीटपणा यावा यासाठी वक्तृत्व, पाठांतर,खेळ, चित्रकला या क्षेत्रातही विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. त्यांच्या अंगच्या गुणांच्या आविष्कारास संधी मिळावी म्हणून सण-उत्सव दिन विशेष साजरे केले जातात. दरवर्षी एखाद्या प्रेक्षणीय स्थळी त्यांची सहल काढली जाते. खेळांचे आयोजन केले जाते.मातकाम,कागदकाम, जीवनव्यवहार यांची प्रात्यक्षिके मुलांकडून केली जातात. 
                इ.स.1920 पासून सुरू झालेल्या कन्या शाळेतील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी दर्जेदार अध्यापन याबरोबरच इतरही अनेक उपक्रम येथे केले जातात. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, गणित परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व तयारी, चित्र रंगवण्याचा स्पर्धेस मार्गदर्शन, हस्ताक्षर सुधारणे, लोकनृत्य असे अनेकविध उपक्रम चालू असतातच. राष्ट्रीय सण- उत्सव, दिनविशेषही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
               प्रज्वालितो ज्ञानमय: प्रदीप: हे ब्रीद सार्थ करण्याचा प्रयत्न गेल्या 124 वर्षापासून सरस्वती मंदिर संस्थेने अविरतपणे केला आहे.
                सकुबाई हिराचंद नेमचंद प्रशाला (1920), लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळा(1925),जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिर (1965),सरस्वती मंदिरशिवण वर्ग (1970), स्त्री व्यक्तिमत्व विकास केंद्र (1994)असा सरस्वती मंदिर संस्थेचा शाखाविस्तार आहे
                अध्ययन -अध्यापन अधिक सजग करणाऱ्या प्रशस्त वर्गखोल्या,विविध साहित्यसंपदेने समृद्ध असणारे ग्रंथालय , विविध भौतिक साधन सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळा ,विद्यार्थ्यांचे शारीरिक सुदृढता निर्माण करण्याबरोबरच विविध खेळांचे प्रात्यक्षिक देण्यासाठी प्रशस्त क्रीडांगण,मनोहरी व सदोदित नटलेले कलादालन ,स्वरसाधनेचा यशस्वी आनंद देणारा संगीत कक्ष ,आधुनिकता संवर्धित करणारा परिपूर्ण संगणक कक्ष ,नव्या तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण प्रक्रिया सहजसोपी करणारी आनंददायी डिजिटल क्लासरूम,विद्युत निर्मिती करणारा सौर उर्जा प्रकल्प शैक्षणिक समृद्धी निर्माण करण्याच्या प्रयासाची साक्ष देतात.आदर्श शाळेतून आदर्श विद्यार्थी जडणघडणीचा प्रवास अविरतपणे चालू आहे. 
                वक्तृत्व कथाकथन वाद-विवाद निबंध एकांकिका नाट्य समूहगीत विविध नृत्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा घोषवाक्य व सुविचार स्पर्धा मेहंदी स्पर्धा विज्ञान प्रश्नमंजुषा बैठे खेळ व मैदानी खेळ स्पर्धा वर्ग सजावट स्पर्धा यासारख्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. विविध सामाजिक संस्था व शासनाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमात व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. विविध स्पर्धामध्ये शाळेने नैपुण्य प्राप्त केले आहे. पालक शिक्षक संघाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कृती शाळा व वासंतिक छंद वर्गाचे आयोजनही करण्यात येते. 
               शिष्यवृत्ती परीक्षा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत व इंग्लिश परीक्षा ,राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्यातर्फे आयोजित हिंदी परीक्षा ,संस्कृती ज्ञान परीक्षा, गणित प्राविण्य परीक्षा ज्ञान प्राविण्य परीक्षा सामान्य ज्ञान परीक्षा, विविध थोर पुरुषांच्या जीवन चरित्रावर आधारित परीक्षा, एम.टी.एस. ,एन.टी.एस, एन.एम.एम.एस. या व इतर परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते.
               गो.वि. दांडेकर ,जगदीश खेबुडकर ,ग.दि.माडगूळकर द.मा.मिरासदार,प्रा.शिवाजीराव भोसले भा.भा.उदगावकर ( साहित्यिक),वि.गो. कुलकर्णी (माजी संचालक, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई) डॉ.मोदी (नेत्रतज्ञ) डॉ. जयंत नारळीकर व दा.कृ.सोमण (खगोलशास्त्रज्ञ) वा.ना.दांडेकर ,वि वि चिपळूणकर व प्राचार्य राम शेवाळकर (शिक्षण तज्ञ) या मान्यवरांनी संस्थेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन गुणवत्तेच्या आलेख उंचावण्याचे लौकिकास्पद कार्य केले आहे. 
               या बाबी भौतिक परिपूर्ण त्याची अनुभूती देतात प्रभावी व परिणामकारक अध्यापन करणाऱ्या शिक्षक वृंद हे सरस्वती मंदिर चे वैशिष्ट्य आहे
               श्री सरस्वती मंदिर ही संस्था स्थापन करणारे, ती नावारूपास यावी म्हणून सदैव धडपडणारे, संस्थेस आर्थिक सहाय्य करणारे ,व या ना त्या कारणाने संस्थेशी संबंधित असलेल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे , त्यागामुळे व सहकार्यामुळे संस्था शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे याची आम्हाला जाणीव आहे. त्या सर्वांच्या ऋणातच राहणे योग्य होईल.
               भविष्यात विविध व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास, अभ्यास केंद्र ,ज्ञान संवर्धन, विविध कौशल्यांचे संवर्धन ,संगणक प्रशिक्षण, विविध भाषांचे वर्ग यासाठी गरजेनुसार व्याख्याने, कार्यशाळा ,चर्चासत्रे, फिल्म्स, डॉक्युमेंटरीज, प्रत्यक्ष कार्यानुभव ,इत्यादी माध्यमांचा उपयोग केला जाईल.भविष्यात शैक्षणिक कार्याचा विस्तार व गुणवत्ता यांचा साकल्याने विचार करण्यात येईल. ज्यायोगे आदर्श व गुणवंत विद्यार्थी व त्यातून समृद्ध समाज निर्मिती करण्यास प्राधान्य देण्यात येईल.

 

Contact Us

Thank you for considering us for your family's educational needs.

When you fill out the appointment request form, please be sure to upload the form you filled out for the current school year.

श्री सरस्वती मंदिर संस्था

Near Ganapati Ghat, Solapur, Solapur, Solapur, MH 413001

+91.9822450495

Hours

Mon

09:00 am – 05:00 pm

Tue

09:00 am – 05:00 pm

Wed

09:00 am – 05:00 pm

Thu

09:00 am – 05:00 pm

Fri

09:00 am – 05:00 pm

Sat

Closed

Sun

Closed

Join Our Mailing List

श्री सरस्वती मंदिर संस्था

Near Ganapati Ghat, Solapur, Solapur, Solapur, MH 413001

+91.9822450495

Copyright © 2025 श्री सरस्वती मंदिर संस्था  - All Rights Reserved.

Powered by VIDYA COMPUTERS- 9422066287

Board of Directors

Board of Directors for the year 2025-2030 

Learn more

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

Accept