• Home
  • संचालक मंडळ
  • ज.रा.चंडक बालक मंदिर
  • ल. कि. प्राथ.शाळा
  • स.हि.ने.प्रशाला.

श्री सरस्वती मंदिर संस्था -

शाळा प्रवेशोत्सव

स्पर्धा परीक्षा यश

शाळा प्रवेशोत्सव


     *लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेमध्ये , शाळा प्रवेशोत्सव, नवागतांचे स्वागत व औक्षण, पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न.* 


     आज सोमवार दि.16 जून 2025 रोजी,लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेमध्ये, शाळा प्रवेशोत्सव , नवागतांचे औक्षण व स्वागत, पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


      *कार्यक्रमास श्री सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री. पांडुरंग देशमुख , सचिवा सौ. रोहिणी तडवळकर, सहकार्यवाह श्री. दत्तात्रय कुलकर्णी, विश्वस्त श्री.किशोर चंडक, लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेच्या मुख्या. सौ. जयश्री राठोड , ज.रा. चंडक बालक मंदिरच्या मुख्या.सौ. सोनाली सोनाळे, सर्व शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.* 


     मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून , कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.


     *शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या सर्व नवीन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन , पेढे भरवून औक्षण करण्यात आले. सर्व मुलांना चॉकलेट्स देण्यात आली. गुलाब फुलांच्या पायघड्यावरून विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला.* 


      लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेच्या *मुख्या.सौ. जयश्री राठोड* यांनी कार्यक्रमाची  प्रस्तावना करताना, सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत केले. तसेच, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल , त्यांना शुभेच्छा दिल्या. इयत्ता पहिली पासून CBSE अभ्यास सुरू होत आहे, अशी माहिती दिली. 


     *श्री सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री. पांडुरंग देशमुख यांनी, आपल्या मनोगतामध्ये,ज्या देशातील विद्यार्थी कष्टाळू आणि अभ्यासू असतात, त्या देशाचे भविष्य उज्ज्वल असते. विद्यार्थ्यांनी वर्षभर मन लावून अभ्यास करावा. यशाची नवीन क्षितिजे गाठावीत. त्यासाठी, मोबाईल कटाक्षाने दूर ठेवावा. मोबाईल हा गरजे पुरताच वापरण्यासाठी असतो. प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा पाया आहे. त्यामध्ये मुलांनी लेखन,वाचन,पाठांतर यावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन केले.* 


     मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना, पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन *सौ. वैशाली मेलगिरी* यांनी केले.तर ,आभारप्रदर्शन  *सौ. वैशाली कोळी* यांनी केले.

योग दिन

स्पर्धा परीक्षा यश

शाळा प्रवेशोत्सव

🔷🔷🔷🔷🔷🔷🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️


      *लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेमध्ये , योग दिन उत्साहात संपन्न.* 


     आज शनिवार दि. 21 जून 2025 रोजी , सरस्वती मंदिर संचलित, लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेमध्ये, आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


    कार्यक्रमासाठी मुख्या.सौ.जयश्री राठोड, योगगुरु श्री.क्रांतिवीर महिंद्रकर, सर्व शिक्षिका आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना, *सौ. मनिषा पतंगे* यांनी, शरीर व मनाचे संतुलन साधण्यासाठी, दररोज योगासने करणे आवश्यक आहे,हे सांगितले.


    मुख्या. सौ.जयश्री राठोड यांनी बुके देऊन, श्री. क्रांतिवीर महिंद्रकर यांचे स्वागत केले. *निसर्गोपचार तज्ञ व योगगुरु असणारे श्री. क्रांतिवीर महिंद्रकर* यांनी, आपल्या निरोगी व उत्साही आयुष्यासाठी , योगासनांचे महत्त्व सांगितले. तसेच, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन,पश्चिमोत्तानासन अशी अनेक आसने व प्राणायामाचे काही प्रकार घेतले.


     *श्री. क्रांतिवीर महिंद्रकर* यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग विशेष वर्तमानपत्र दिले. आभार प्रदर्शन *मुख्या. सौ. जयश्री राठोड* यांनी केले. 


स्पर्धा परीक्षा यश

स्पर्धा परीक्षा यश

**राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षा निकाल* 

🥉🥉🥈🥈🥇🥇🏅🏅



 *23 मार्च 2025 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल* *100% लागला असून* *लक्ष्मी किर्लोस्कर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा तथा केंद्र गुणवत्ता यादीत घवघवीत  असे यश* *संपादन केले आहे.* 

 *जिल्हा तथा केंद्र गुणवत्ता* *यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे* 


 🔴 *इयत्ता पहिली* 

1)चि. आरुष शाम चव्हाण- केंद्रात चौथा 

2)कु. गौरवी विशाल चंदेले-  केंद्रात पाचवी 

3)चि. विश्व अमोल भोसले- केंद्रात सहावा 

4)कु. जान्हवी पंकज यादव- केंद्रात सहावा 


🔴 *इयत्ता दुसरी* 

1) कु.समृद्धी संदीप शिंदे- जिल्ह्यात सातवी 

2)कु. स्वरांजली जगदीश जाधव- केंद्रात पहिला 

3)कु. मनस्वी मनीष गवळी- केंद्रात दुसरा  

4)चि. उत्कर्ष नितीन धारा- केंद्रात दुसरा 

5)कु. रितिका संतोष कलबुर्गी केंद्रात दुसरा 

6)कु. गुंजन गजानन काटेकर केंद्रात चौथी 

7)कु. रिद्धी संजय पाटील केंद्रात पाचवी 

8)कु. स्वरा धनराज घोडके केंद्रात सहावी 

9)चि. समर्थ श्रीकृष्ण गोसावी केंद्रात सातवा 

10)कु. अवनी नितीन मंठाळकर- केंद्रात आठवा


 🔴 *इयत्ता तिसरी* 

1)चि. मिहीर हरिभाऊ वारे- केंद्रात दुसरा 

2)चि. सिद्धाराम रवी कलाल- केंद्रात दुसरा 

3)चि. चैतन्य भागवत देवकते- केंद्रात तिसरा 

4) चि. वीर गिरीश कराळे केंद्रात आठवा 

5)कु. संजीवनी सुहास गायकवाड केंद्रात नववा 


🔴 *इयत्ता चौथी* 

1)कु. स्वरा नीरज महामुरे- केंद्रात तिसरा 

2)कु. सृष्टी आंबय्या हिरेमठ केंद्रात चौथा 

3)चि शंभूराजे प्रभाकर बचुटे- केंद्रात दहावा 

4)चि. वीरा अमोल भोसले- केंद्रात दहावा 

5) चि. सैफ सलीम मुल्ला- केंद्रात बारावा 

6)कु. नम्रता निमेश गवळी केंद्रात तेरावी 

7)कु. हर्षिता आनंद संदुपटला केंद्रात तेरावी 


 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे शाळेतर्फे व संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन..!!

Flexible Scheduling

Convenient Online Classes

We understand that students have busy schedules. That's why we offer flexible scheduling options to help students fit test prep into their busy lives.

Proven Results

Convenient Online Classes

Convenient Online Classes

Our test prep courses have a proven track record of success. Our students consistently achieve higher test scores and gain admission to top colleges and universities.

Convenient Online Classes

Convenient Online Classes

Convenient Online Classes

Our test prep courses are offered online, so students can study from anywhere. We use the latest technology to provide an engaging and interactive learning experience.

गुरुपौर्णिमा

श्री सरस्वती मंदिर संस्था



 *लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न.* 


     आज गुरुवार दिन.10 जुलै 2025 रोजी,श्री सरस्वती मंदिर संचलित, लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेमध्ये गुरुपौर्णिमा मोठा उत्साहात संपन्न झाली.


    *कार्यक्रमास सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री. पांडुरंग देशमुख, खजिनदार श्री. सुधीर देव, सदस्या सौ. मंजिरी अंत्रोळीकर, प्रमुख पाहुण्या स.ही.ने. प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. केशव खिलारे, लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेच्या मुख्या.सौ. जयश्री राठोड, ज.रा.चंडक बालक मंदिरच्या मुख्या. सौ. सोनाली सोनाळे, सर्व शिक्षिका आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.* 


     प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. *इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी,आपल्या भाषणातून गुरुचे महत्व विशद केले. गुरु शिष्यांच्या सुंदर गोष्टी सांगितल्या.* 


     सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री. पांडुरंग देशमुख यांनी, आजच्या प्रमुख पाहुण्या सौ.केशव खिलारे यांना श्री सरस्वती देवीची प्रतिमा, बुके आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत, मुख्या.सौ. जयश्री राठोड यांनी सर्व मान्यवरांचा गुलाबापुष्प देऊन सत्कार केला. मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व शिक्षिकांना, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.


     MTS परीक्षेतील,सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते, गोल्ड मेडल,सर्टिफिकेट व गुलाब पुष्प देऊन कौतुक करण्यात आले.


     *संस्थेचे सदस्य श्री.राहुल औरंगाबादकर व लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेच्या, माजी ज्येष्ठ सहशिक्षिका सौ. वृंदा वैद्य यांनी, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना वह्या दिलेल्या आहेत.* याप्रसंगी, मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.


     *सहशिक्षिका सौ. सुरेखा कोरे* यांनी गुरुपौर्णिमेविषयी सविस्तर माहिती सांगितली. गुरु नेहमी आपल्या विद्यार्थ्यांचे कल्याण चिंततात.त्याला योग्य रस्ता दाखवतात. आपण गुरुजनांचा मान राखला पाहिजे. आपण त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. गुरु आणि शिष्यांच्या नात्याचे अनेक पैलू त्यांनी उलगडून दाखवले. *प्रमुख पाहुण्या सौ. केशव खिलारे* यांनी, गुरुमुळे आयुष्याची वाट सुखकर होते. गुरु आपणांस ज्ञानाचा प्रकाश देतात.आई- वडील, शिक्षक, निसर्ग हे आपले गुरु आहेत. त्यांच्याकडून आपण चांगल्या गोष्टी शिकाव्यात, असे मार्गदर्शन केले. 


     कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन सौ. प्रतिभा गायकवाड* यांनी केले. तर *आभार प्रदर्शन मुख्या.सौ. जयश्री राठोड* यांनी केले.



विविध कार्यक्रम

    श्री सरस्वती मंदिर संस्था

    Near Ganapati Ghat, Solapur, Solapur, Solapur, MH 413001

    +91.9822450495

    Copyright © 2025 श्री सरस्वती मंदिर संस्था  - All Rights Reserved.

    Powered by VIDYA COMPUTERS- 9422066287

    Board of Directors

    Board of Directors for the year 2025-2030 

    Learn more

    This website uses cookies.

    We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

    Accept