श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिर मध्ये सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी या शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवशी बालकांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात आला.
शाळेचा पहिला दिवस या दिवशी रंगीत रांगोळ्या रंगीबेरंगी फुग्यांची कमान, फुलांच्या पायघड्या, सुंदर फलकलेखन फुलामाळांची सजावट व मुलांना फोटो काढण्यासाठी *सेल्फी पॉइंट* तयार करण्यात आला. याने शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला. मुलांना गुलाबाचे फुले व फुगे देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. पांडुरंग देशमुख, कार्यवाह सौ. रोहिणी तडवळकर, सहकार्यवाह मा. दत्ता कुलकर्णी, खजिनदार मा. सुधीर देव, सदस्य सौ मंजिरी अंत्रोळीकर सदस्या किशोर चंडक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली सोनाळे, लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री राठोड मॅडम, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नवगतांच्या स्वागतानंतर सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच सर्व मुलांचे कार्यवाह सौ. रोहिणी तडवळकर सदस्या सौ. मंजिरी अंत्रोळीकर व मुख्याध्यापिका सौ. सोनाली सोनाळे मॅडम यांनी औक्षण केले. तसेच संस्थेच्या मान्यवरांनाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. व बालकांना खाऊ देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित *जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिर* मध्ये शनिवार ,दिनांक 21जून 2025 रोजी या शैक्षणिक वर्षातील जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शक म्हणून क्रांतिवीर महिंद्रकर उपस्थित होते. महिंद्रकर यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे काही प्रात्यक्षिक करून दाखविले व विद्यार्थ्यांकडून करून घेतले. तसेच विद्यार्थ्यांना थोडक्यात योगासनाचे महत्त्व सांगितले.
जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिर शाळेमध्ये आषाढी दिंडी उत्साहात संपन्न.
आज शुक्रवार दि. 4 जुलै 2025 रोजी, सरस्वती मंदिर संचलित, जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिर शाळेमध्ये, आषाढी दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
*आषाढी दिंडीच्या या कार्यक्रमास, सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री. पांडुरंग देशमुख, सहकार्यवाह श्री.दत्तात्रय कुलकर्णी, सदस्य श्री. प्रशांत बडवे, सदस्य सौ. रेवती कुलकर्णी, जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिरच्या मुख्या. सौ.सोनाली सोनाळे व लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेच्या मुख्या. सौ.जयश्री राठोड शिक्षक वर्ग आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल- रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे व सजवलेल्या, सुंदर पालखीचे पूजन करण्यात आले. *विद्यार्थ्यांनी चंद्रभागेच्या तिरी,हरिनामाची टोपली, झगा अशी पारंपारिक आषाढी दिंडीची गाणी उत्साहाने सादर केली. विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला. सारे वातावरण भक्तीमय झाले होते.
विद्यार्थ्यांची आषाढी दिंडी शुभांगी बुवा यांच्या शुभराय मठामध्ये नेण्यात आली. तेथेही *विद्यार्थ्यांनी आषाढी दिंडीची गाणी, गाण्याच्या तालावर फुगडी खेळण्यात आले. त्यांना शुभांगी बुवा यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना चिमणी व हत्तीची गोष्ट सांगितली.
विठ्ठलाची गाणी, ओव्या,अभंग,भगवे झेंडे याने सर्व फळे सुशोभित केले होते.तसेच, श्री *विठ्ठल- रुक्मिणीच्या प्रतिमेभोवती सुंदर आरास केली होती. वारकऱ्यांचे सुशोभन करण्यात आले होते. अवघी पंढरी सरस्वती मंदिरात अवतरली होती.* सर्व विद्यार्थी वारकरी पोशाखात शाळेत आले होते .शालेय परिसर सजवण्यात आला होता. सर्व विद्यार्थी आणि शिक्षिका यांनी आनंदाने आषाढी दिंडीमध्ये सहभाग घेतला.
श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिर मध्ये गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी *"गुरुपौर्णिमा"* हा सण पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा कार्यक्रम करण्यात आला.
*या कार्यक्रमास सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष अॅड. श्री.पांडुरंग देशमुख, खजिनदार श्री. सुधीर देव ,सदस्या सौ. मंजिरी अंत्रोळीकर तसेच जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली सोनाळे मॅडम तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.*
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महषी॔ व्यासाच्या व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
*गुरु म्हणजे आहे काशी*
*साती तीर्थ तया पाशी*
*तुका म्हणा ऐसे गुरु*
*चरण त्याचे हृदयी धरू*
लहान बालकांची कोवळी शरीरे, संस्कारक्ष मने यांना घडवण्याकरिता आपली गुरु कोण याची ओळख करून देण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु- शिष्यांच्या गोष्टी सांगण्यात आली. तसेच मातृ-पितृ पूजनाचा कार्यक्रम केला. यातून आई-वडिलांच्या प्रति आदर बाळगण्याचा संदेश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. तसेच मुलांनी आपल्या आई-वडिलांचे पाद्यपूजन करून त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि गुरुजनांचाही आशीर्वाद घेतला. अशा रीतीने कार्यक्रम संपन्न झाला.
गुरूपौर्णिमा
Copyright © 2025 श्री सरस्वती मंदिर संस्था - All Rights Reserved.
Powered by VIDYA COMPUTERS- 9422066287
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.