• Home
  • संचालक मंडळ
  • ज.रा.चंडक बालक मंदिर
  • ल. कि. प्राथ.शाळा
  • स.हि.ने.प्रशाला.

प्रशाळेतील संपन्न झालेले विविध कार्यक्रम

श्री सरस्वती मंदिर संस्थेचा वर्धापनदिन...!

श्री सरस्वती मंदिर संस्थेच्या गौरवास्पद वाटचालीस १३० वर्षे  पूर्ण झाली असून,  सरस्वती संस्था १३१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. 

    ज्या काळात स्त्री शिक्षणाचा विचारसुद्धा जनमानसात रुजलेला नव्हता अशा काळात म्हणजे इ.स. १८९५ मध्ये स्त्री शिक्षणाचा पुरोगामी विचार संस्थेने प्रत्यक्ष आचरणात आणला. त्यासाठी स्त्रियांच्या शिक्षणाकडे आणि उन्नतीसाठी

श्री सरस्वती मंदिर संस्थेच्या गौरवास्पद वाटचालीस १३० वर्षे  पूर्ण झाली असून,  सरस्वती संस्था १३१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. 

    ज्या काळात स्त्री शिक्षणाचा विचारसुद्धा जनमानसात रुजलेला नव्हता अशा काळात म्हणजे इ.स. १८९५ मध्ये स्त्री शिक्षणाचा पुरोगामी विचार संस्थेने प्रत्यक्ष आचरणात आणला. त्यासाठी स्त्रियांच्या शिक्षणाकडे आणि उन्नतीसाठी विशेष लक्ष देणारी तसेच त्यासाठी झटणारी आणि स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी अशी ही एक आदर्श संस्था आहे.

     शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करताना शेकडो व्यक्तींच्या योगदानाची जोड संस्थेला मिळाली आहे. अनेकांचे हातभार लागूनच संस्था मोठी झाली आणि तिने स्वतःबरोबर अनेकांना सुद्धा मोठे केले आहे.

         "स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून स्त्री उन्नती" या ध्येयपूर्ती साठी  मनावर विदयेचा सोनेरी संस्कार करणाऱ्या संस्थेला येणाऱ्या भविष्यकाळातील उदिदष्ट्ये अधिक वेगाने, जोमाने साध्य करावयाची आहेत.

     महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीतील अनेक नवीन शिक्षणप्रवाहांची नोंद घेत आपल्या कार्यप्रणालीची दिशा संस्थेने ठरविली आहे. विकासामध्ये व स्पर्धेत निभाव लागावयाचा असेल तर उच्चतम गुणवत्ता संपादन करणे अपरिहार्य आहे. यामध्ये सजगता ठेऊन डिजिटल क्लासरूम, ई-लर्निंग,आर.ओ.वाॅटर प्रोसेसिंग युनिट असे अनेक विज्ञानाभिमुख उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत. अपारंपरिक उर्जास्रोताचा वापर करून पर्यावरणाचे एक उद्दिष्ट सोलार सिस्टीम वापरून पूर्ण केले आहे.

    श्री सरस्वती मंदिर संस्थेच्या देदीप्यमान वाटचालीत सदैव सोबत असणार्‍या तसेच ज्ञानदीप तेजोमय करणार्‍या सर्व हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा..!

श्री सरस्वती मंदीरमधे रंगला पहाट गाण्यांचा कार्यक्रम

 श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित सकुबाई हिराचंद नेमचंद प्रशालेमध्ये दिवाळी निमित्त दिनांक 19 /10/ 2025 रोजी पहाटे 6:00 वाजता पहाटगाणी या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन   करण्यात आले होते्.

       प्रारंभी   श्री सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष ॲड. मा. श्री पांडुरंग देशमुख ,   खजिनदार मा श्री सुधीर देव सर, उपाध्यक्षा मा. सौ रेवती कुलकर्णी , माजी 

 श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित सकुबाई हिराचंद नेमचंद प्रशालेमध्ये दिवाळी निमित्त दिनांक 19 /10/ 2025 रोजी पहाटे 6:00 वाजता पहाटगाणी या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन   करण्यात आले होते्.

       प्रारंभी   श्री सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष ॲड. मा. श्री पांडुरंग देशमुख ,   खजिनदार मा श्री सुधीर देव सर, उपाध्यक्षा मा. सौ रेवती कुलकर्णी , माजी अध्यक्ष ॲड.रघुनाथ दामले, सदस्य मा.श्री शिरीष कुलकर्णी , मा. सौ प्रिती चिलजवार  यांच्या शुभहस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले. 

       व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ नीता येरमाळकर मॅडम ,पर्यवेक्षक श्री मुकुंद गिरी,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ जयश्री राठोड , संगीत विभाग प्रमुख श्री संतोष कोथळीकर  व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वैशाली कोथळीकर  यांच्या शुभहस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले.                                                           


      राजा गणराजा नाचे अंगणी या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली.सौ वैशाली कोथळीकर यांनी हे गीत सादर केले.,यानंतर  येई ओ विठ्ठले भक्तजन वत्सले, कोथळीकर  दांपत्यांनी सादर केले .  ग. दि माडगूळकर लिखित"विकत घेतला श्याम गायिले, जगदीश खेबूडकर लिखित "चंद्र आहे साक्षीला या सुधीर फडके यांनी संगीत दिलेले  शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातून  हे गीत कोथळीकर दाम्पत्यांनी गायले व रसिकांची दाद मिळवली. गीतकार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले ने मजसी  परत मातृभूमीच्या सागरा प्राण तळमळला हे देशभक्तीपर गीत कोथळीकर दांपत्यांनी सादर केले, राग हमीर वर आधारित शकील बदायुनी लिखित  नौशाद यांनी संगीत दिलेले  मधुबन राधिका नाचे रे, गिरीधर  कि मुरलीया बाजेरे,  या श्री संतोष कोथळीकर यांनी गायलेल्या गीतावर,कु. स्वराली पतकी  हिने बहारदार नृत्य सादर केले, पुरंदरदास लिखित किर्तन देवी लक्ष्मी ला आळविणारे गीत भाग्यदा लक्ष्मी बारम्मा या गीताने वन्स मोअर मिळवले.  यांनी रचलेले पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेले कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर या अप्रतिम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली, श्री व सौ कोथळीकर यांच्या गायनाने  रसिक मंत्रमुग्ध झाले होते.

स.हि.ने.प्रशालेत हिंदी दिन साजरा

स.हि.ने.प्रशालेत हिंदी दिन साजरा

 या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता येरमाळकर, पर्यवेक्षक श्री. मुकुंद गिरी सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

यावेळी कु.संजना कुर्तीपल्ली- 6वीअ या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले आणि काही कहावते व त्यांचे अर्थ सादर केले.

   त्यानंतर कु.निष्ठा जगताप 6वीअ या विद्यार्थिनीने एक हिंदी कविता सादर केली.

    शिक्षक मनोगत 

 या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता येरमाळकर, पर्यवेक्षक श्री. मुकुंद गिरी सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

यावेळी कु.संजना कुर्तीपल्ली- 6वीअ या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले आणि काही कहावते व त्यांचे अर्थ सादर केले.

   त्यानंतर कु.निष्ठा जगताप 6वीअ या विद्यार्थिनीने एक हिंदी कविता सादर केली.

    शिक्षक मनोगत -सौ.सुहासिनी गायकवाड यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगून हिंदी भाषा देशातील सर्व लोकांना सरळ ,सोपी वाटते.सर्व लोक सहज व्यवहारात वापरू शकतात.तसेच हिंदी भाषा सुसंस्कृत व कोमल आहे.म्हणून हिंदी भाषेला राजभाषा म्हणून घोषित करण्यात आले, असे आपल्या मनोगतात सांगितले.

   प्रशालेचे पर्यवेक्षक श्री मुकुंद गिरी सर यांनी आपल्या मनोगतात हिंदी भाषेची वैशिष्ट्य सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स.हि.ने. प्रशालेत क्रांती दिन साजरा

इंग्रजांच्या  गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट अर्थात तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा दिवस क्रांती दिन ! तसेच दिन साजरे करताना त्या मागचा हेतू ,महत्त्व काय ,कोणत्या क्रांतिकारकांनी कोणते काम केले , त्यांचा आपण आदर्श घ्यावा हे विद्यार्थ्यांना समजावे यासाठी आपण दिन

इंग्रजांच्या  गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट अर्थात तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा दिवस क्रांती दिन ! तसेच दिन साजरे करताना त्या मागचा हेतू ,महत्त्व काय ,कोणत्या क्रांतिकारकांनी कोणते काम केले , त्यांचा आपण आदर्श घ्यावा हे विद्यार्थ्यांना समजावे यासाठी आपण दिन साजरे करतो असे विचार प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ नीता येरमाळकर प्रास्ताविकेतून व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री सरस्वती मंदिर संस्थेचे खजिनदार श्री सुधीर देव, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता येरमाळकर ,

पर्यवेक्षक श्री मुकुंद गिरी , सहशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी प्रतिमा पूजन करून क्रांतिकारकांना अभिवादन केले. 

संस्थेचे खजिनदार श्री सुधीर देव यांनी क्रांतिकारकांच्या बलिदानाने स्वातंत्र्याचा पाया रचला गेला . 1942 मध्ये म . गांधीं जींचे आंदोलन ,चले जाव ची चळवळ यामध्ये अनेक पिढ्या ,व्यक्ती, महिला त्यांचा त्याग , पराक्रमाची परिणती यामुळे आपल्याला लाभलेले स्वातंत्र्य थोडक्यात सांगितले . 

प्रशालेचे पर्यवेक्षक श्री मुकुंद गिरी यांनी क्रांती दिनाचे महत्व सांगितले .

1453 मध्ये औद्योगिक क्रांती कशी झाली याची यावर सविस्तर माहिती दिली वास्को-द-गामा याने समुद्रातून मार्ग शोधला व भारतात पोहोचला 1600 मध्ये इंग्लंडच्या राणीच्या मदतीने सुरत मध्ये पहिली वखार स्थापन केली . संपूर्ण इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रशालेच्या जेष्ठ शिक्षिका सौ. सुहासिनी गायकवाड यांनी मानले .

श्री सरस्वती मंदिर संस्थेत 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा..

 श्री सरस्वती मंदिर संस्थेत 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा..     सर्वप्रथम प्रमुख अतिथी मा.श्री.प्रतापसिंह परदेशी(निवृत्त ग्रुप कॅप्टन - वायुसेना), डाॅ.राजीव प्रधान- (पॅथालाॅजिस्ट)यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी मा.श्री.प्रतापसिंह परदेशी (निवृत्त ग्रुप कॅप्टन -वायुसेना),डाॅ.राजीव 

 श्री सरस्वती मंदिर संस्थेत 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा..     सर्वप्रथम प्रमुख अतिथी मा.श्री.प्रतापसिंह परदेशी(निवृत्त ग्रुप कॅप्टन - वायुसेना), डाॅ.राजीव प्रधान- (पॅथालाॅजिस्ट)यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी मा.श्री.प्रतापसिंह परदेशी (निवृत्त ग्रुप कॅप्टन -वायुसेना),डाॅ.राजीव प्रधान, श्री. सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री. पांडुरंग देशमुख , उपाध्यक्ष सौ. रेवती कुलकर्णी,खजिनदार - श्री. सुधीर देव ,माजी अध्यक्ष- श्री.रघुनाथजी दामले, सदस्य श्री.शिरीष कुलकर्णी, श्री.प्रशांत बडवे,श्री जिड्डीमनी,स. हि. ने.प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता येरमाळकर ,ल.कि.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री राठोड,ज. रा. चंडक बालक मंदिर सौ.सोनाली सोनाळे,सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.  राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत आणि संविधानवाचन करण्यात आले. संविधान वाचन सौ.सुचेता पोकळे यांनी केले.    व्यासपीठावर उपस्थित संस्थेच्या मान्यवरांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला.      प्रमुख अतिथी मा.श्री.प्रतापसिंह परदेशी यांनी मुलांना स्वकर्तृत्वावर नावलौकिकता मिळवावी हे सांगताना त्यांनी स्वानुभव सांगितले की त्यांनी स्वबळावर NDA मध्ये प्रवेश मिळवला. मुलांच्या समवेत,शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्याचा आनंदानुभव व्यक्त केले डाॅ. राजीव प्रधानयांनी आजचे विद्यार्थी हे उद्याचे मान्यवर आहेत, त्यांना सुसंस्कृत बनविण्यासाठी पालक ,शिक्षकांनी प्रयत्नशील असावे . असे सांगत प्रत्येकाने वृक्षारोपण केले पाहिजे, असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
अध्यक्षीय भाषणात श्री.पांडुरंग देशमुख यांनी सर्व प्रथम देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांचे स्मरण करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.      उपस्थित सर्वांनी नशामुक्त शपथ घेतली. शपथेचे वाचन सौ.रोहिणी कुलकर्णी यांनी केले. स.हि.ने.प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता येरमाळकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप तीन कौमी नारे देऊन करण्यात आला.

स.हि.ने.प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न

    श्री सरस्वती मंदिर संस्था संचालित स.हि.ने.प्रशालेत एसएससी 2025 परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्यास प्रमुख अतिथी डाॅ.नभा काकडे ,सरस्वती मंदिर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ रेवती कुलकर्णी, सुधीर देव सर,सिंधूताई चंद्रगी- कोंडेवार,देणगीदार - सुनंदा तांबोळकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता येरमाळकर, 

    श्री सरस्वती मंदिर संस्था संचालित स.हि.ने.प्रशालेत एसएससी 2025 परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्यास प्रमुख अतिथी डाॅ.नभा काकडे ,सरस्वती मंदिर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ रेवती कुलकर्णी, सुधीर देव सर,सिंधूताई चंद्रगी- कोंडेवार,देणगीदार - सुनंदा तांबोळकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता येरमाळकर, पर्यवेक्षक श्री. मुकुंद गिरी उपस्थित होते.

मंचावर उपस्थित संस्थेच्या मान्यवरांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. शिवाय गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्वरूपात देणगी देणारे देणगीदार सुनंदा तांबोळकर यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता येरमाळकर मॅडम यांनी प्रास्ताविक करताना उपस्थितांचे स्वागत करून

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेचा 2020 ते 2024 पर्यंतचा शालांत परीक्षेचा निकाल सांगितला. तसेच शाळेच्या नियोजनात असणारे कोचिंग, मार्गदर्शन या सर्व गोष्टी यांचा समावेश आहे,असे सांगून उपस्थित गुणवंत विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. 

कार्यक्रमास कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी डॉ. नभा काकडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

तसेच यश म्हणजे काय? तर आपल्या गुणांची वाढ आणि सुसंस्कारित व्यक्ती म्हणजे यश असे सांगून त्यांनी शिक्षकांच्या कामाची सुद्धा दखल घेतली..सामाजिक भान ठेवून उत्तम नागरिक बनण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी दिला .

अध्यक्षीय भाषणात सौ.रेवती कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नशील असावे. प्रयत्नाने नक्कीच चांगले फळ मिळतात.प्रयत्नांती परमेश्वर असे सांगून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

शालांत परीक्षा 2025 मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी चि.सिद्धांत तुपेरे याने आपल्या मनोगतात त्याला मिळालेल्या यशात त्याचे आई -वडील आणि शिक्षकांचा वाटा मोठा आहे असे सांगत सर्व शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. 

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री मुकुंद गिरी यांनी केले.

मानक लेखन स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ

  दि.31 श्री सरस्वती मंदिर संस्था संचालित स.हि.ने. प्रशाला आणि बी आय एस यांच्या संयुक्त विद्यमाने मानक लेखन स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ    श्री सरस्वती मंदिर स.हि.ने प्रशालेत बी आय एस मानक लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून स.हि.ने.प्रशालेच्या मुख्याध

  दि.31 श्री सरस्वती मंदिर संस्था संचालित स.हि.ने. प्रशाला आणि बी आय एस यांच्या संयुक्त विद्यमाने मानक लेखन स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ    श्री सरस्वती मंदिर स.हि.ने प्रशालेत बी आय एस मानक लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून स.हि.ने.प्रशालेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौ. नीता येरमाळकर मॅडम पर्यवेक्षक श्री. मुकुंद गिरी सर लाभले. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली त्यानंतर भारतीय मानक गीत - "कुछ रचना है कुछ सजना है" या गीताचे प्रक्षेपण करण्यात आले त्यानंतर गुणवत्ता प्रतिज्ञा करण्यात केली.    प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. मुकुंद गिरी सर यांनी बी आय एस म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड या संस्थे विषयीची माहिती दिली. ज्ञान ,विचार, नियोजन, कामाबद्दल ध्येयनिष्ठता ,यामध्ये उत्तमता असावी,हे सांगताना सरांनी जपानच्या कंपनीचे उदाहरण दिले.  या कार्यक्रमात आणि स्पर्धेसाठी  इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.      या सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बीआयएस कंपनीकडून देण्यात आलेल्या भेटवस्तू देण्यात आले.    विद्यार्थ्यांची स्पर्धा व परीक्षण आणि पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचे यादीवाचन, कार्यक्रमाची सजावट प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ सुचेता पोकळे व सौ सुमित्रा भगत यांनी केले.

सोलापूरचे पक्षी वैभव

  सोलापूर येथील सरस्वती मंदिर या प्रशालेत ' सोलापूरचे पक्षी वैभव ' या नावाने पक्ष्यांविषयी माहिती आणि छायाचित्रे यांचे एक दालन स्थापन करण्यात आले आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध निसर्ग प्रेमी आणि पक्षी अभ्यासक कै. लिओनर्ड स्टटमन यानी दिलेल्या देणगी मधून या केंद्राची निर्मिती झाली आहे. या केंद्राला कै. stuttman यांचे नाव देण्यात आले आहे. सोलापूरच

  सोलापूर येथील सरस्वती मंदिर या प्रशालेत ' सोलापूरचे पक्षी वैभव ' या नावाने पक्ष्यांविषयी माहिती आणि छायाचित्रे यांचे एक दालन स्थापन करण्यात आले आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध निसर्ग प्रेमी आणि पक्षी अभ्यासक कै. लिओनर्ड स्टटमन यानी दिलेल्या देणगी मधून या केंद्राची निर्मिती झाली आहे. या केंद्राला कै. stuttman यांचे नाव देण्यात आले आहे. सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विषयांचे निवृत्त प्राध्यापक डॉ. रमेश खटावकर यांची रोटरीच्या माध्यमातून स्टटमन यांची मैत्री झाली. हे पक्षी केंद्र या मैत्रीचे फलित आहे. अनेकांना सोलापूरच्या पक्षी वैभवा विषयी फारशी माहिती नाही. सोलापूर हे अनेक वैविध्यपूर्ण आणि सुंदर पक्ष्यांचे वसतिस्थान आहे. अनेक स्थलांतरित पक्षी उदा फ्लेमिंगो, क्रेन्स, चक्रवाकासह अनेक बदके वगैरे पक्षी ठराविक ऋतूत सोलापूरला मुक्कामाला येतात. माळढोक हा दुर्मिळ पक्षी सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे आढळेल. अशा या सोलापूरच्या पक्षी वैभवाची माहिती सगळ्यांना व्हावी, पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि पक्ष्यांच्या संरक्षणा विषयी सर्वांनी जागरूक असावे या हेतूने हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या स्थापने मध्ये प्रकल्प प्रमुख डॉ. राजीव प्रधान प्रा. डॉ. निनाद शहा आणि प्रा. व्यंकटेश गंभीर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. सरस्वती मंदिर प्रशालेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री पांडुरंग देशमुख,सचिव सौ रोहिणी तडवळकर, श्री रघुनाथ दामले, मुख्याधपिका सौ नीता येरमाळकर आणि शिक्षक वर्ग यांनी या कामी अतिशय मोलाचे सहकार्य केले आहे. या दालनात १२० स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे फोटो आणि त्यांची माहिती दिली आहे. काही स्थानिक व काही स्थलांतरित पक्ष्यांचे आवाजही फोटो सोबत क्यू आर (QR) कोड देऊन ऐकण्याची सोय केली आहे.

गुरुपौर्णिमा

  स.हि.ने प्रशालेत गुरुपौर्णिमा संपन्न 

   दि: 10जुलै रोजी स.हि.नेप्रशालेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला.

      आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. असे कोणतेही ज्ञान नाही की ज्याला व्यासांचा स्पर्श झाला नाही गुरु चंद्रासारखे पूर्ण असतात प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेचे महत्त्व प्रशालेचे पर्यवेक्षक श्री गिरी सर यांनी आप

  स.हि.ने प्रशालेत गुरुपौर्णिमा संपन्न 

   दि: 10जुलै रोजी स.हि.नेप्रशालेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला.

      आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. असे कोणतेही ज्ञान नाही की ज्याला व्यासांचा स्पर्श झाला नाही गुरु चंद्रासारखे पूर्ण असतात प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेचे महत्त्व प्रशालेचे पर्यवेक्षक श्री गिरी सर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सांगितले. 

    उपस्थित संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. रेवती कुलकर्णी सदस्य श्री. प्रशांत बडवे व श्री.राहुल औरंगाबादकर तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता येरमाळकर पर्यवेक्षक श्री. मुकुंद गिरी यांच्या हस्ते महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

     गुरुपौर्णिमेनिमित्त प्रशालेतील सर्व शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यार्थ्यांकडून गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर विद्यार्थ्यांचे मनोगत झाले  

     संस्थेचे सदस्य श्री प्रशांत बडवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुरु इतकेच आई-वडीलही तेवढेच महत्त्वाचे गुरु असतात तसेच संत नामदेवांनाही गुरूंची कशी आवश्यकता होती हे त्यांनी सांगितले.

     या कार्यक्रमास संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. रेवती कुलकर्णी सदस्य श्री. प्रशांत बडवे व श्री.राहुल औरंगाबादकर तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता येरमाळकर पर्यवेक्षक श्री. मुकुंद गिरी उपस्थित होते.

डॉ. ह ना. जगताप यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान

   सोलापूर दि-05/07/2025 रोजी स .हि. ने. प्रशालेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे गाढे अभ्यासक, लेखक डॉ. ह ना. जगताप यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.     सर्वांना उच्च दर्जाचे समान शिक्षण प्रदान करून आपल्या राष्ट्राला सातत्याने न्याय आणि चैतन्यमय ज्ञानी समाजामध्ये परिवर्तित करण्याच्या हेतूने ही सभा आयोजित करण्यात आली होती

   सोलापूर दि-05/07/2025 रोजी स .हि. ने. प्रशालेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे गाढे अभ्यासक, लेखक डॉ. ह ना. जगताप यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.     सर्वांना उच्च दर्जाचे समान शिक्षण प्रदान करून आपल्या राष्ट्राला सातत्याने न्याय आणि चैतन्यमय ज्ञानी समाजामध्ये परिवर्तित करण्याच्या हेतूने ही सभा आयोजित करण्यात आली होती.      राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, त्याचे आधारित पाच स्तंभ मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN), भारताला एक जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे यासंबंधी माहिती देत प्रशालेतील शिक्षक श्री दिलीप राठोड यांनी सभेचे प्रास्ताविक केले.    विद्यार्थी गुणवत्ता वाढीची मुलतत्वे आणि शिक्षक समीकरणाची तत्वे या विषयाला केंद्रस्थानी मानून डॉक्टर जगताप यांनी प्रथम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली.तसेच भारतात कशा पद्धतीने शैक्षणिक धोरण राबवले गेले हे सांगून "धोरण" ही संकल्पना स्पष्ट केली.तर 5+3+3+4 या सूत्राला आधार मानून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे स्वरूप त्याची तत्वे स्पष्ट करून त्यामध्ये झालेल्या महत्त्वाच्या बदलांविषयी माहिती सांगितली.     या सभेला प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता येरमाळकर पर्यवेक्षक श्री मुकुंद गिरी , प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

गजर विठूचा

  आजि सोनियाचा दिनु,वर्षे अमृताचा घनुहरि पाहिला रे,हरि पाहिला रे।सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी।।
सोलापूर दि.05/07/2025 रोजी स .हि .ने. प्रशालेत "गजर विठूचा हा भक्तीगीतांचा कार्यक्रम पार पडला.    याप्रसंगी श्री सरस्वती मंदिर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. रेवती कुलकर्णी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ नीता येरमाळकर, पर्यवेक्षक श्री . मुकुंद 

  आजि सोनियाचा दिनु,वर्षे अमृताचा घनुहरि पाहिला रे,हरि पाहिला रे।सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी।।
सोलापूर दि.05/07/2025 रोजी स .हि .ने. प्रशालेत "गजर विठूचा हा भक्तीगीतांचा कार्यक्रम पार पडला.    याप्रसंगी श्री सरस्वती मंदिर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. रेवती कुलकर्णी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ नीता येरमाळकर, पर्यवेक्षक श्री . मुकुंद गिरी , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विठ्ठलाच्या सुंदर प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.  या भक्तीगीत कार्यक्रमात प्रशालेच्या संगीत विभागातील बालचमूंनी हरी जय जय हरी,सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,या विठूचा गजर हरि नामाचा,विठ्ठला तू वेडा कुंभार,चंद्रभागेच्या तिरी,खेळ मांडीयेला वाळवंटी ठायी, अशी भक्तीगीते विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली. "हेचि दान देगा देवा" या भैरवीने कार्यक्रमाचा समारोप केला.*      यानंतर कार्यक्रमातील बालचमूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे संगीत विभाग प्रमुख श्री. संतोष कोथळीकर सरांचे अभिनंदन करत हा संगीताचा प्रवास असाच पुढे चालू ठेवावा ,असे आपल्या मनोगतातून संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.रेवती कुलकर्णी म्हणाल्या.  पांडुरंगा चरणी आपली ही संगीत सेवादरवर्षी समर्पित करू," असे सांगत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .नीता येरमाळकर यांनी आभार व्यक्त केले.

होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

  स. हि. ने प्रशालेत शैक्षणिक साहित्य वाटप     प्रशालेतील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.     मुंबई महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांच्या हस्ते साहित्याचे वाटप झाले. अध्यक्षस्थानी श्री सरस्वती मंदिर संस्थेचे सचिवा रोहिणी तडवळकर होत्या . यावेळी संस्थेचे सदस्य दत्तात्रय कुलकर्णी, मुख्याध्यापिका न

  स. हि. ने प्रशालेत शैक्षणिक साहित्य वाटप     प्रशालेतील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.     मुंबई महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांच्या हस्ते साहित्याचे वाटप झाले. अध्यक्षस्थानी श्री सरस्वती मंदिर संस्थेचे सचिवा रोहिणी तडवळकर होत्या . यावेळी संस्थेचे सदस्य दत्तात्रय कुलकर्णी, मुख्याध्यापिका नीता येरमाळकर, राम तडवळकर, सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते..     भारताचे उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी जिद्दीच्या जोरावर एक रुपयाने उद्योग सुरू केला आणि जगात श्रीमंत व्यक्ती झाले, व जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशामागे जिद्द असते इतिहासात नाव नोंद करणाऱ्या व्यक्तीचे प्रवास सोपा नसतो ते अडचणींना तोंड देत इतिहास घडवतात त्यांच्यात जिद्द होती,असे प्रकाश राठोड म्हणाले.       सचिव सौ.रोहिणी तडवळकर म्हणाल्या, आपण सगळे एक समाजात राहतो आपण एकमेकांना मदत केली तरच समाज सुंदर आणि सुरक्षित होतो आणि समाजातील होतकरू व्यक्तींना मदत करा असेही त्यांनी आवाहन केले      मुख्याध्यापिका सौ.नीता येरमाळकर यांनी प्रास्ताविक केले.

बीज गोळे निर्मिती कार्यशाळा

  स.हि. ने. प्रशाला,(इको क्लब) रोटरी क्लब ऑफ सोलापूर व इको फ्रेंडली क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बीज गोळे निर्मिती कार्यशाळा       मनुष्याने झाडांची तोड केल्यामुळे तसेच पर्यावरणात हस्तक्षेप केल्यामुळे निसर्गाच्या ऋतुचक्रात बिघाड होऊन कोणतेही ऋतू केव्हाही येत आहेत. हे टाळण्यासाठी आपण झाडे लावून पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे" असे प्रशाले

  स.हि. ने. प्रशाला,(इको क्लब) रोटरी क्लब ऑफ सोलापूर व इको फ्रेंडली क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बीज गोळे निर्मिती कार्यशाळा       मनुष्याने झाडांची तोड केल्यामुळे तसेच पर्यावरणात हस्तक्षेप केल्यामुळे निसर्गाच्या ऋतुचक्रात बिघाड होऊन कोणतेही ऋतू केव्हाही येत आहेत. हे टाळण्यासाठी आपण झाडे लावून पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे" असे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता येरमाळकर यांनी आपले प्रास्ताविक मांडले. 
     कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष रोटे.श्री सुनील माहेश्वरी, सचिव रोटे. श्री ब्रिजकुमार गोयधनी, निर्वाचितअध्यक्ष सौ. धनश्री केळकर पुराणिक, सचिव श्री ब्रिजकुमार गोयधनी, निर्वाचित सचिव श्री, निलेश फोफलिया, रोटे. संतोष कणेकर, रोटे. प्रशांत घुले, इको फ्रेंडली क्लब चे सदस्य परशुराम कोकणे,सरस्वती कोकणे, अजित कोकणे, प्रांजल संजय डोळे, सरस्वती मंदिर संस्थेच्या सदस्य रेवती कुलकर्णी, सदस्य श्री प्रशांत बडवे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता येरमाळकर उपस्थित होते.
        रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या निर्वाचित अध्यक्ष सौ. धनश्री केळकर पुराणिक यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांविषयी माहिती सांगितली. 
     इको फ्रेंडली क्लबचे सदस्य श्री. परशुराम कोकणे यांनी बीज गोळ्यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगून ते तयार करण्यासंबंधीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले. तसेच शाळेविषयी उपक्रमशील शाळा म्हणून त्यांनी शाळेचा उल्लेख केला.
         सूचनेनुसार विद्यार्थ्यांचे गट करून विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, रोटरी क्लबच्या सदस्यांनी जमा केलेले जवळजवळ 1500 बीज गोळे तयार करण्यात आले.जांभूळ, फणस, अशोक, आंबा इत्यादी अनेक झाडांच्या बिया संकलित करण्यात आल्या होत्या. हे सर्व बीजगोळे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीच्या वारकऱ्यांच्याकडे सुपूर्त केल्या जाणार असून त्यामुळे ते विविध ठिकाणी रुजतील.या पर्यावरण पूरक उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.

योगदिन उत्साहात साजरा

 स.हि.ने.प्रशालेत 11 वा जागतिक योगदिन उत्साहात साजरा

        ॐ संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम् देवा भांगं यथा पूर्वे सत्र्ञ्जानाना ।। या प्रार्थनेने योगासनांच्या सादरीकरणास सुरुवात झाली.

 डॉ .शोभा शहा यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक भंडारी, मानसी मैले, गोविंद भंडारी,रूपा कामूर्ती यांनी प्रथम विद्यार्थ्यांकडून शिथिलीकरणाचे व्यायाम करू

 स.हि.ने.प्रशालेत 11 वा जागतिक योगदिन उत्साहात साजरा

        ॐ संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम् देवा भांगं यथा पूर्वे सत्र्ञ्जानाना ।। या प्रार्थनेने योगासनांच्या सादरीकरणास सुरुवात झाली.

 डॉ .शोभा शहा यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक भंडारी, मानसी मैले, गोविंद भंडारी,रूपा कामूर्ती यांनी प्रथम विद्यार्थ्यांकडून शिथिलीकरणाचे व्यायाम करून घेतले,सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक घेतले. वृक्षासन,वक्रासन, त्रिकोणासन पादहस्तासन, ताडासन इ. अनेक आसने करवून घेतली..तसेच प्राणायाम कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी हे प्रकार घेतले.

        नियमित योगासने करण्याचा व मोबाईल दूर ठेवण्याचा संकल्प करूया ,असा अनमोल सल्ला विवेकानंद केंद्राचे योगगुरू डाॅ. शोभा शहा यांनी विद्यार्थ्यांना दिला.

       11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा थीम "योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ" असून ज्ञानेंद्रियांच्या सक्षमतेसाठी, योगाभ्यास निश्चितच उपयुक्त आहे." असे विचार प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता येरमाळकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले.                     

      जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉ शोभा शहा ,श्री सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष ॲड श्री पांडुरंग देशमुख,सदस्य श्री राहुल औरंगाबादकर मुख्याध्यापिका सौ नीता येरमाळकर, पर्यवेक्षक श्री मुकुंद गिरी, विवेकानंद विकास केंद्राचे मानसी मैले,गोविंद भंडारी,रूपा का मुर्ती, बालाजी यन्नम असे योग शिक्षक उपस्थित होते. तसेच विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

एस.एस.सी.परीक्षेतील स.हि.ने. प्रशालेचे यश--

 एस.एस.सी.परीक्षेतील स.हि.ने. प्रशालेचे यश--     सोलापूर - फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेत स.हि.ने. प्रशालेचा निकाल 96.96 टक्के लागला.     परीक्षेस प्रविष्ट झालेल्या एकूण 66 विद्यार्थ्यांपैकी उच्च श्रेणीमध्ये 16, प्रथम श्रेणी मध्ये 14 व द्वितीय श्रेणीत 19

 एस.एस.सी.परीक्षेतील स.हि.ने. प्रशालेचे यश--     सोलापूर - फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेत स.हि.ने. प्रशालेचा निकाल 96.96 टक्के लागला.     परीक्षेस प्रविष्ट झालेल्या एकूण 66 विद्यार्थ्यांपैकी उच्च श्रेणीमध्ये 16, प्रथम श्रेणी मध्ये 14 व द्वितीय श्रेणीत 19 तर तृतीय श्रेणीत 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.      प्रशालेतून चि.तुपेरे सिद्धांत सारीपुत्र याने (86.00%) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक , तर चि.मुजावर अरमान साहेबलाल (84.60%) याने द्वितीय व कु.अंजिखाने गौरी शीतल ( 84.20%) हिने तृतीय क्रमांक संपादन करून उत्कृष्ट निकालाची परंपरा जतन केली.          श्री.सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.पांडुरंग देशमुख, सचिव सौ.रोहिणीतडवळकर ,उपाध्यक्ष श्री.मकरंद जोशी, सौ. रेवती कुलकर्णी,सहसचिव श्री.दत्तात्रय कुलकर्णी,खजिनदार श्री.सुधीर देव,संस्थेचे सदस्य डॉ मोहनराव दाते, अ‍ॅड.श्री. रघुनाथ दामले,श्री.शिरीष कुलकर्णी,श्री.प्रशांत बडवे,सौ. प्रिति चिलजवार, श्री.किरण वळसंगकर ,श्री.शशिकांत जिड्डीमनी,सौ. मंजिरी अंत्रोळीकर, श्री.राहुल औरंगाबादकर, श्री. सुनील कुलकर्णी,श्री.किशोरजी चंडक, श्री.राजेंद्र गांधी आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता येरमाळकर आदी मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.

Video

बीज गोळे निर्मिती कार्यशाळा

 स.हि. ने. प्रशाला,(इको क्लब) रोटरी क्लब ऑफ सोलापूर व इको फ्रेंडली क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बीज गोळे निर्मिती कार्यशाळा    मनुष्याने झाडांची तोड केल्यामुळे तसेच पर्यावरणात हस्तक्षेप केल्यामुळे निसर्गाच्या ऋतुचक्रात बिघाड होऊन कोणतेही ऋतू केव्हाही येत आहेत. हे टाळण्यासाठी आपण झाडे लावून पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे" 

विविध कार्यक्रम फोटो

    श्री सरस्वती मंदिर संस्था

    Near Ganapati Ghat, Solapur, Solapur, Solapur, MH 413001

    +91.9822450495

    Copyright © 2025 श्री सरस्वती मंदिर संस्था  - All Rights Reserved.

    Powered by VIDYA COMPUTERS- 9422066287

    Board of Directors

    Board of Directors for the year 2025-2030 

    Learn more

    This website uses cookies.

    We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

    Accept