शुक्रवार दि. 21 जून 2024 रोजी, सरस्वती मंदिर संचलित, लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेमध्ये, योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
*श्री. क्रांतिवीर महिंद्रकर* यांनी योगासनांचे महत्त्व विशद केले. *योगासनामुळे शरीर लवचिक बनते. स्नायू बळकट होतात. मन प्रसन्न राहते. उत्साह वाढतो,चपळता येते.विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होतो. दररोज योगासन व प्राणायाम केल्यामुळे आयुष्यातील ध्येय गाठणे शक्य होते,* असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच, योगासने व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
याप्रसंगी, *मुख्या. सौ. जयश्री राठोड, सर्व शिक्षिका आणि विद्यार्थी* उपस्थित होते.
शनिवार दि. 15 जून 2024 रोजी,सरस्वती मंदिर संचलित , लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेमध्ये, नवागतांचे औक्षण व स्वागत,पाठ्यपुस्तक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ सदस्य श्री. प्रमोद कामतकर हे होते. मुख्या.सौ. जयश्री राठोड, सर्व शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संस्मरणीय होण्यासाठी शाळा विशेष सजवण्यात आली होती. शाळेच्या मुख्य गेटमध्ये फुग्यांची कमान करण्यात आली होती. शाळेच्या व्हरांड्यामध्ये ठिकठिकाणी रंगीबेरंगी फुगे लावलेले होते. विद्यार्थ्यांसाठी गुलाब- पाकळ्यांच्या पायघड्या घातलेल्या होत्या. रंगीबेरंगी, आकर्षक रांगोळ्या घालून शालेय परिसर सुशोभित केला होता. शाळा सजावट करण्यासाठी सर्व शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले. आकर्षक पोशाखातील डोरेमॉननी विद्यार्थ्यांची करमणूक केली. त्यांच्या विविध हालचाली पाहून, विद्यार्थ्यांना हास्याची मेजवानी मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आली. मुख्या. सौ. जयश्री राठोड यांनी प्रास्ताविक करताना, विद्यार्थ्यांशी हितगुज साधले आणि अभ्यास करण्याची प्रेरणा दिली.
शाळेतील नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण व स्वागत करण्यात आले. तसेच, प्रमुख पाहुणे श्री. प्रमोद कामतकर यांच्या हस्ते, विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली
प्रमुख पाहुणे श्री. प्रमोद कामतकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध अभ्यास करण्याचे महत्त्व सांगितले. तसेच, नवीन पुस्तकांची काळजी घ्या, दररोज त्यांचा अभ्यास करा, त्यातील ज्ञान आत्मसात करा, असे प्रतिपादन केले. सातत्यपूर्वक अभ्यास करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनीषा पतंगे यांनी केले. तर, आभार प्रदर्शन सौ. वैशाली कोळी यांनी केले.
Kami menggunakan cookie untuk menganalisis lalu lintas situs web dan mengoptimalkan pengalaman situs web Anda. Dengan menerima penggunaan cookie, data Anda akan dikumpulkan bersama data pengguna lainnya.