स. हि.ने प्रशालेत गणित दिनानिमित्त 23 डिसेंबर 2024 रोजी गणित जत्रेचे आयोजन करण्यात आले होते . या जत्रेमध्ये सर्व विद्यार्थी उत्साहाने आणि चिकित्सक वृत्तीने सहभागी झाले होते. 5 वी ते 7 वी गटातून 115 तर 8 वी ते 10 वी गटातून 69 असे एकूण 184 उपक्रम* सादर करण्यात आले होते. या जत्रेचे उद्घाटन सरस्वती मंदिर संस्थे च्या सदस्या सौ. रेवती कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मनोगतात गणिताचे जीवनातील महत्व तसेच ज्याचा गणित विषय चांगला त्याला इतर विषयाची भीती वाटत नाही, पाढे पाठ असण्याचे फायदे या विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थांना भरपूर गणिती उदाहरणे देऊन त्यांना विचार करण्यास प्रवृत्त केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ नीता येरमाळकर यांनी प्रास्ताविकेत रामानुजन यांना गणिताची गोडी कशी निर्माण झाली या विषयी माहिती व छोटी गोष्ट सांगितली. प्रशालेच्या विद्यार्थिनीनी गणिती गीत व गणिती उखाणे , संगीत शिक्षक संतोष कोथळीकर आणि वंदना देवकते यांच्या मदतीने सादर केले.गणित जत्रेचे उद्घाटन पाहुण्यांनी गणिती कोडी सोडवून केले. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. हायस्कूल आणि प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी या जत्रेचा आनंद घेतला. सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री रघुनाथ दामले आणि खजिनदार श्री सुधीर देव यांनी गणित जत्रेस भेट दिली.
सरस्वती मंदिर संस्था संचलित स.हि.ने. प्रशालेत संविधान दिन आणि शहीद दिन साजरा...
या कार्यक्रमात सुरुवातीस स.हि.ने. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता येरमाळकर आणि दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. प्रिया झेंडे आणि प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. मुकुंद गिरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
प्रशालेच्या विज्ञान प्रमुख सौ.संगीता रेळेकर यांनी आपल्या मनोगतातून संविधान दिन साजरा करण्यामागील उद्देश,महत्व, वैशिष्ट्ये आणि संविधानामधील महत्त्वाच्या शब्दांचे अर्थ विद्यार्थ्यांना समजेल अशा शब्दात सांगितले.
प्रशालेच्या सहशिक्षिका सौ. सुहासिनी गायकवाड यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले.
प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. मुकुंद गिरी यांनी आपल्या मनोगतात 26 नोव्हेंबर प्रमाणे अजूनही अनेक शहीद दिन आहेत ते वेगवेगळ्या घटनांसाठी झालेल्या शहिदांसाठी साजरे केले जातात याविषयी विस्तृतपणे विद्यार्थ्यांना सांगितले. संविधान दिन तसेच शहीद दिन हे आदराचे दिन आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे असेही ते म्हणाले. यावर्षी संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे साजरे केले जाणार आहे. या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका,पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ.प्रिया झेंडे आणि विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.मुकुंद गिरी यांनी आपल्या नेहमीच्याच ओघवत्या आणि सुंदर शैलीत केले.या कार्यक्रमासाठी बैठक व्यवस्था आणि ध्वनी व्यवस्था राहुल गायकवाड, विनायक साबळे, अण्णासाहेब बाळगे यांनी केली.
स. हि. ने. प्रशाला में हिंदी दिन समारोह संपन्न
दि. 21 सितंबर, हिंदी दिन समारोह के उपलक्ष में श्री. सरस्वती मंदीर संस्था के सचिवा श्रीमती. प्रितीजी चिलजवार, कोषाध्यक्ष श्री. सुधीरजी देव,विद्यालय के प्रधान अध्यापिका नीताजी येरमाळकर तथा विद्यालय के अध्यापिका और छात्र उपस्थित थे|
इस समारोह के अध्यक्ष श्री. सुधीर देव जी ने हिंदी भाषा की महत्ता बताकर सभी को शुभकामनाऐं दे दी|
विद्यालय के अध्यापिका केशर खिलारे जी ने समारोह की प्रस्तावना करते हुए राजभाषा हिंदी की महत्ता बतायी |
विद्यालय के अध्यापिका श्रीमती सुहासिनी गायकवाड जी अपने मनोगत मे हिंदी दिल की भाषा है| यह सरल, सहज और समावेश की दृष्टी से काफी सुगम भाषा है| हिंदी भाषा का प्रचार और प्रसार को बढावा देने के लिए हिंदी दिवस का समारोह किया जाता है | और भाषा की महत्ता बताकर सभी को हिंदी दिन की शुभकामनाऐं दे दी|
कु. वैष्णवी, दुर्वा और निशा इन छात्राओने इस अवसर पर अपने विचार व्यक्त किये|
विद्यालय के अध्यापक, अध्यापिका तथा कर्मचारीयोंकी मदत से ये समारोह सफलतापूर्वक संपन्न हो गया.
निरोप लाडक्या बाप्पाला.....
सोलापूर- दि.14 - सरस्वती मंदिर संस्थेने गणरायाला अतिशय थाटामाटात मिरवणूक काढून निरोप दिला. सामाजिक कार्यकर्ते,पाणीवेस तालीम चे आधारस्तंभ तसेच "कुलदैवत ज्वेलर्सचे" संचालक मा. श्री. चंद्रकांत रामकृष्ण वानकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांच्या हस्ते बाप्पाचे पूजन करण्यात आले नंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.अॅड.श्री.रघुनाथ दामले, सचिवा सौ. प्रिती चिलजवार, खजिनदार श्री.सुधीर देव, सदस्य सौ.रेवती कुलकर्णी व किरण करमरकर, स.हि.ने.प्रशालेच्या मुख्या. सौ.नीता येरमाळकर, ल.कि.प्राथमिक शाळेच्या मुख्या. सौ.जयश्री राठोड,ज.रा.चंडक बालक मंदिरच्या मुख्या.सौ.सोनाली सोनाळे, सरस्वती मंदिर संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध पथकातून बाप्पा साठी आनंददायी व उत्साही वातावरणात सादरीकरण केले .......
▪️ विविध आकर्षक डावांचे सादरीकरण करणारे लेझीम पथक
▪️ आकाशाला गवसणी घालणारे भगवे ध्वजपथक,,
▪️ सामूहिक कलाविष्काराने नटलेले झांज पथक,
▪️ स्वसंरक्षण करण्यासाठी सज्ज मुलींचे लाठी काठीचे पथक*
▪️ जनजागृती करणारे घोषणा पथक
▪️ समाजप्रबोधन करणारे घोषफलके ...
हे सर्व यंदाच्या मिरवणुकीची वैशिष्ट्ये होती.
मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे वेशभूषा करून ल.कि प्राथ. शाळेचे सहभागी झालेले विद्यार्थी होते. पर्यावरण जागृती देशभक्ती, स्त्री सन्मान या विषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न या मिरवणुकीतून केला गेला. सर्व विद्यार्थी, शिक्षक,पालक आणि प्रेक्षक अशा सर्वांनी मिरवणुकीतील सादरीकरणाचा मनसोक्त आनंद लुटला. मिरवणुकीनंतर बाप्पाला निरोप देण्यात आला आणि सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सर्वांचे सहकार्य लाभले
श्री सरस्वती मंदीर संस्था संचलित स. हि. ने. प्रशालेतील विद्यार्थिनींना राईड फाॅर रोटरी कडून सायकलींचे वाटप
दि. 9 सप्टेंबर, रोजी राईड फाॅर रोटरी या उपक्रमातर्गत स. हि. ने. प्रशालेतील विद्यार्थिनींना सायकल बॅंक उपक्रमांतर्गत 10 सायकली देण्यात आल्या.
या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ सोलापूर चे माजी अध्यक्ष, रोटरी डिस्ट्रिक्ट प्रांतपाल रोटे.जयेश भाई पटेल,रोटरी क्लब ऑफ सोलापूर चे माजी अध्यक्ष रोटे.किशोर जी चंडक, अध्यक्ष सुनिल माहेश्वरी, सचिव ब्रिज कुमार गोयधानी, माजी अध्यक्ष रोटे.डॉ. ज्योती चिडगूपकर, रोटे. धनश्री केळकर, पराग कुलकर्णी, संदीप झवेरी, निलेश फोफलिया,आकाश बाहेती, मितेश पंचमिया, सौ. श्रुती चंडक तसेच सरस्वती मंदीर संस्थेचे अध्यक्ष श्री. रघुनाथ दामले , सचिव सौ.प्रिति चिलजवार, खजिनदार श्री.सुधीर देव, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता येरमाळकर आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्योती चिडगूपकर यांनी केले. मुली आत्मनिर्भर व धाडसी व्हावे या उद्देशाने सायकल बॅंक उपक्रम राबविला जात आहे. तरी विद्यार्थिनींनी सायकल उत्तम पद्धतीने चालवावी व नीट काळजी घ्यावी व पुढील विद्यार्थ्यांनाही त्याचा उपयोग घेता यावा यासाठी सायकलींची उत्तम काळजी घ्यावी, असे सांगितले.
रोटे. श्री किशोर जी चंडक यांनी विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम समजून घ्यावेत आणि त्यांचे पालन करावे असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
रोटे. जयेश भाई पटेल यांनी रोटरी क्लब च्या कार्याविषयी माहिती दिली. वैद्यकीय क्षेत्रातील पोलिओची लस संपूर्ण भारतात रोटरी क्लब कडून उपलब्ध केली जाते. तसेच CERVICAL CANCER ची लस सुद्धा प्रशालेतील विद्यार्थिनींना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.* तसेच या पुढेही मदत करण्याची तयारी दर्शविली. आणि विद्यार्थ्यांसाठी इंटरअॅक्ट क्लब चालविण्यासाठी अध्यक्षांची परवानगी मागितली व सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. रघुनाथ दामले आणि सचिव सौ.प्रिति चिलजवार यांनी उपस्थितांना सन्मानित केले व सर्व रोटेरियन्सना धन्यवाद दिले. आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सायकलींची विशेष काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता येरमाळकर यांनी सायकल बॅंक उपक्रम आमच्या शाळेत छान पद्धतीने चालतो. आणि यात संबंधित शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक, विद्यार्थी यांचे सहकार्य चांगले मिळते, असे सांगून उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमानंतर श्री सरस्वती मंदिर संस्थेच्या सचिव सौ. प्रिति चिलजवार यांनी श्रीगणेशाची पूजा केली आणि सर्वांना प्रसाद दिला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
सोलापुरात प्रथमच स. हि. ने प्रशालेत उमलले सहस्त्रदल कमळ
सम्रुद्धीचे ,भरभराटीचे प्रतिक मानले जाणारे ,श्रीविष्णुला अत्यंत प्रिय असणारे सहस्रदल कमळ सोलापूरच्या 125 हून जास्त वर्षे शिक्षणक्षेत्रात अग्रेसर असलेल्या सरस्वती मंदिर संस्थेच्या स.हि.ने.कन्याप्रशालेत ऊमलले आहे. विशेषम्हणजे हे सहस्रदल कमळ सोलापूरात प्रथमच ऊमलले आहे.
श्री सरस्वती मंंदिर संस्थेच्या सदस्या सौ रेवती कुलकर्णी मॅडम यांनी स. हि. ने प्रशालेतील बागेत ThousandPetal म्हणजेचं सहस्त्रदल कमळ* Pink cloud, Rose pink* *हे कमळाचे कंद स्वहस्ते लावले होते.कमळ लावण्यासाठीआवश्यक 50 किलो शेणखत ही दिले होते.
श्री सरस्वती मंदिर संस्थचे अध्यक्ष ॲड श्री रघुनाथ दामले, सचिव सौ प्रिती चिलजवार,मुख्याध्यापिका सौ नीता येरमाळकर यांनी ज्ञानाचे ,समृध्दीचे प्रतिक सहस्त्रदल कमळ शाळेत प्रथमच उमलल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.
सौ रेवती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हरीत सेनेच्या प्रमुख सौ संगीता रेळेकर व इयत्ता 8 वी च्या हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी कमळाची निगा राखली. श्री राहुल गायकवाड व आण्णासाहेब बाळगे यांचे सहकार्य लाभले.
आता पाहूया या सहस्त्रदल कमळाचे पौराणिक महत्व
सृष्टी निर्मितीच्या काळापासून सहस्रदल कमळाचे धार्मिक अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीहरी विष्णूंच्या बेंबीतून जे कमळ निघाले ते हेच सहस्त्रदल कमळ असून यातूनच ब्रह्मदेव प्रगट झाले. देवांमध्येही स्वयं भगवंत श्रीहरी, विष्णू ,ब्रह्मदेव अशा वेगवेगळ्या देवांच्या हातात हेच सहस्त्रदल पद्म कमळ असते असा उल्लेख पद्मपुराणांमध्ये आलेला आहे. सर्व देवांचे हे अतिशय आवडते व प्रिय फुल असून याला ब्रह्म स्वरूप मानले गेले आहे असा उल्लेखही पद्मपुराणात आढळतो. याला शेकडो लोक लावतात पण प्रत्येकाकडे हे फूल फुलतेच असे नाही. शेकडो लोकांमधून एखाद्याकडेच हे फूल फुलते. या फुलाच्या दर्शनाने अनेक जन्मांची पापे नाश पावतात तसेच हे सहस्रदल कमळ भरभराट व समृद्धीचे प्रतिक मानले जाते. याच्या दर्शन साक्षात परब्रम्हस्वरूप मानले जाते.
सहस्त्रदल कमळाची वैज्ञानिक माहिती
सहस्त्रदल कमळ लावण्याचा कालावधी साधारणपणे जानेवारी, फेब्रुवारी महिना असते,कारण सरती थंडी व लागता उन्हाळा असे तापमान महिन्यांत मिळते. मार्चपासून त्याची वाढ व्हायला सुरुवात होते व नंतर ते फुलायला लागते.सहस्रदल कमळाला 1008 पाकळ्या असतात.याचा सुगंध छान असतो .ही प्रजाती भारतीय (नेटिव्ह )आहे. पंधरा दिवस हे फूल फुललेले राहते.नंतर बाहेरच्या पाकळ्या गळत जातात व आतल्या पाकळ्या उमलत राहतात .याचा गुलकंदांप्रमाणे कमल कंद करतात. गुलकंदांप्रमाणे औषधी असून विटामिन ए,डी युक्त असतो. डोळ्यांना व कानांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. याच्याकंदाची भाजी ,वेफर्स बनवितात.पानांची भजीबनवितात. पानाच्या देठापासून सूत तयार होते.सुतापासून वस्त्र व दिव्यांच्या वाती बनविल्या जातात. अध्यात्मिक क्षेत्रात दिव्यांच्या वातीमध्ये सर्वात उत्तम वात याची गणली जाते.
आज शनिवार दि.7 सप्टेंबर 2024 रोजी, श्री सरस्वती मंदिर संस्थेमध्ये, श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा, संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री. रघुनाथ दामले यांच्या हस्ते करण्यात आया मंगल प्रसंगी, सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्री.रघुनाथ दामले,ज्येष्ठ सदस्या सौ. रेवती कुलकर्णी, स.हि.ने. प्रशालेच्या मुख्या.सौ.नीता येरमाळकर, ल.कि. प्राथमिक शाळेच्या मुख्या. सौ. जयश्री राठोड, ज.रा.चंडक बालक मंदिरच्या मुख्या.सौ.सोनाली सोनाळे तसेच, तिन्ही विभागाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. ढोल -ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले.सुशोभित रांगोळ्या घातल्या होत्या. शालेय परिसर फुलांनी सजवला होता. श्री गणेशाची विधीवत पूजा आणि प्राणप्रतिष्ठा सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री. रघुनाथ दामले यांनी केली. श्री.अथर्व मुळेगावकर यांनी पूजेचे पौरोहित्य केले
श्री गणेशाची आरती सगळ्यांनी मिळून म्हटली.भक्तिमय वातावरणामध्ये साग्रसंगीत, व्यवस्थित पूजा संपन्न झाली. *गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, असा जयघोष करण्यात आला. उपस्थितांना पंचखाद्य,मोदक , पेढे व चुरमुरे याचा प्रसाद देण्यात आला. याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी सुंदर वेशभूषेत आणि उत्साहाने आले होते.
श्री सरस्वती मंदिर संस्थाया: स. हि. ने. प्रशालायां संस्कृत दिन समारोह: सम्पन्न: जात:|
दिनांङक: -२२, संस्कृत दिन समारोहस्य आरम्भ: विद्याया: देवता सरस्वत्या: प्रतिमा पूजनेन अभवत्|
संस्थाया: सचिवा सौ. प्रिति चिलजवार महोदया, मुख्यातिथीरूपेण कु. श्रुती देवळे (प्राध्यापिका, पु. अ. हो. विद्यापीठ सोलापूर) तथा स. हि. ने. प्रशालाया: प्रधानाचार्या सौ नीता येरमाळकर महोदया व्यासपीठे उपस्थितवत्य:|*संस्थाया: सचिवा सौ. प्रिति चिलजवार महोदया अतिथे: सन्मानं कृतवती|
तथा समारोहे सहभागिन: सर्वेषां छात्राणाम् अभिनन्दनं कृतवती | तथा समारोहे विद्यार्थिन्य: समावेशनं कृते गौरी महोदयै अपि अभिनन्दनं कृतवती |*
मुख्यातिथे: भाषणे देवळे महोदया संस्कृतस्य महती तथा छात्रजीवने संस्कृतस्य महत्वं
उक्तवा संस्कृतं अधीत्य अर्थार्जन स्य विविधानि स्त्रोताणि उक्तवती| *नासा, आय. आय. टी.संशोधन क्षेत्रे तथा सङगणकस्य कृते संस्कृत भाषा कथं उपयुक्ता अस्ति* एतद् विषये कथितवती|
अस्मिन् समारोहस्य प्रास्ताविकं प्रशालाया: संस्कृत शिक्षिका सौ. गौरी महोदया कृतवती तथा *संस्कृतस्य विविधानि वैशिष्ट्यानि उक्त्वा ' राघवायदवीयम्' एतद् ग्रन्थस्य दृष्टान्त दत्त्वा संस्कृत भाषाया:अलौकिकत्वं उक्तवती|*
*अतिथे: परिचयं* आङग्ल भाषाध्यापिका कु. अंकिता माळगी महोदया कृतवती|
अस्मिन् समारोहे दशमी कक्षाया: छात्रे संस्कृतगीतं *'वन्दे भारत मातरम् '* गीतवत्यौ|
मनोरञनात्मक कार्यक्रमे अष्टमी कक्षाया: छात्रा: प्रहेलिकाभ्यास: तथा गीतगायनं कृतवत्य:|
नवमी कक्षाया: छात्रा: *बालिका विद्या'* विषये लघुनाट्यस्य प्रस्तुतीकरणं कृतवत्य:|
समारोहस्य ऋणनिर्देशनं जान्हवी म्हेत्रे कृतवती| तथा
सर्वाणि सूत्राणि कु. खुशी चौधरी स्वीकृत्य सम्यक् तया सूत्रसञ्चालनं कृतवती|
अस्मिन् समारोहस्य सिद्धतां प्रयोगशाला सहायक श्री राहुल गायकवाड,प्रशालाया: कर्मकारा: श्री. विनायक साबळे, अण्णासाहेब बाळगे तथा सौ जाधव भगिनी कृतवती |
सरस्वती मंदिर संस्था संचालित स.हि.ने. प्रशालेत 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी स्त्रीरोगतज्ञ.मा.श्री.डॉ.बाहुबली दोशी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संगीत शिक्षक संतोष कोथळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत राज्यगीत व देशभक्तीपर गीते "रविकिरणांच्या हिंदोळ्यावर" व "जय हिंद हिंद" ही गीते सादर केली.सौ विद्या माने यांनी विद्यार्थ्यांना सामूहिकरित्या संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून घेतले तर सहशिक्षिका सौ.रोहिणी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना तिरंगा प्रतिज्ञा दिली.
अतिथींचा परिचय सहशिक्षक श्री मुकुंद गिरी यांनी करून दिला. श्री. सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा.ॲड.श्री. रघुनाथ दामले यांच्या शुभहस्ते शाल, बुके ,सरस्वतीची प्रतिमा देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त मा.डॉ.मोहन दाते यांना लोकमान्य विद्यापीठाकडून विद्यानिधी ही पदवी प्रदान झाल्याबद्दल श्री सरस्वती मंदीर संस्था, तीनही विभागाच्या वतीने, बुके शाल,रोपटे, भेटवस्तू देऊन सन्मनित करण्यात आले. याप्रसंगी.ॲड.श्री. रघुनाथ दामले, संस्थेच्या सचिवा मा.सौ.प्रीती चिलजवार, खजिनदार मा.श्री.सुधीर देव, माजी अध्यक्ष मा श्री शिरिष तुळजापूरकर जेष्ठ सदस्य मा.श्री.डॉ.मोहन दाते,सदस्य मा. सौ. रेवती कुलकर्णी व संस्थेचे मान्यवर पदाधिकारी व स.हि.ने. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता येरमाळकर, , ज.रा. चंडक बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली सोनाळे, ल.कि. प्राथ. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री राठोड, तिन्ही विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
यानंतर विविध स्पर्धांची पारितोषिके विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले.तसेच संगीत व क्रीडा विभागातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे ,मार्गदर्शक शिक्षक संतोष कोथळीकर क्रीडा शिक्षक वीरेश अंगडी यांचा अतिथींच्या शुभहस्ते बुके देऊन सन्मान करण्यात आला.
तीनही विभागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी,हिंदी,संस्कृत या विविध भाषांमधे भाषणे सादर केली.
प्रमुख पाहुण्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या "एखादा इव्हेंट म्हणून दिनविशेष साजरा करू नका तर त्या गोष्टीचे महत्त्व जाणा".मुलींनो अर्थसाक्षर व्हा ,स्वसंरक्षणासाचे धडे घ्या,स्वावलंबी व्हा असा मोलाचा संदेश दिला.मुलांना पर्यावरण रक्षण करा,प्रदूषण टाळा.देशाला भ्रष्टाचार मुक्त करा, राष्ट्रीय एकोपा जोपासा" .मोबाईल चा पर कमी करून जास्तीत जास्त चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे* असे बहुमोल विचार डॉ. श्री. बाहुबली दोशी यांनी व्यक्त केले.
डॉ मोहन दाते यांनी दाते पंचागाला 108 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांना जी वाड़्मयीन पदवी मिळाली त्या प्रित्यर्थ सरस्वती मंदिराच्या प्रांगणात जो सन्मान केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
संस्थेच्या सचिवा सौ प्रिती चिलजवार यांनी माननीय मोहन दाते सरांना दिलेल्या निमंत्रण पत्रिकेचे वाचन केले व स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या .
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना रुजावी म्हणून हर घर तिरंगा हा उपक्रम संपूर्ण देशात राबविला गेला. आपल्या देशासाठी कर्तव्य पार पाडावे,अभिमान जपावा,असे प्रेरक विचार सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष ॲड रघुनाथ दामले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. मुकुंद गिरी यांनी केले तर प्रशालेच्या सहशिक्षिका सौ. सुचेता पोकळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.तीन कौमिनारे देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सर्वांचे सहकार्य लाभले.
स.हि.ने. प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
सोलापूर दि १- "वैचारिक अधिष्ठान खंबीर असणारे व आपल्या लेखणीतून समाजभान जागृत करणारे लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे मानबिंदू होते. निरपेक्ष बुद्धिवादाचे तत्वज्ञान मांडणाऱ्या लोकमान्यांनी आपल्या चतुःसूत्रीने जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा महायज्ञ मांडला." असे प्रतिपादन प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक व समीक्षक श्री.शरदकुमार एकबोटे यांनी केले. विद्यार्थ्यांना लोकमान्य व लोकशाहीर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अधिक परिचय करून देण्यासाठी विविध कथा व दाखले यांचा समावेश उल्लेखनीय ठरला.
सरस्वती मंदिर संस्थेच्या स.हि.ने प्रशालेद्वारा आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते.
" लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा दृढ राष्ट्राभिमान, साहित्य रचनेतून व संस्कारातून आकारास आलेले समाजप्रबोधन या बाबी भारतीयांसाठी दीपस्तंभासम आहेत. " असे विचार प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता येरमाळकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले.
कु.दुर्वा महिंद्रकर, कु.मृणाल महामूरे,कु.सिद्धी पाटील व चि.ओंकार सुत्रावे या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा जीवनपट उलगडून दाखविणारी भाषणे सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रशालेतील सहशिक्षिका सौ.सुचेता पोकळे यांनी विद्यार्थ्यांकडून भाषणाची तयारी करून घेतली होती.
प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक व समीक्षक श्री.शरदकुमार एकबोटे,
सरस्वती मंदिर संस्थेचे ज्येष्ठ सदस्य डॉ.मोहन दाते, सचिव सौ.प्रिती चिलजवार, खजिनदार श्री.सुधीर देव ,मुख्याध्यापिका सौ.नीता येरमाळकर व पर्यवेक्षक श्री.दिलीप राठोड यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
"आपली भारतीय संस्कृती व इतिहास यांविषयी कृतज्ञता भाव असण्यासह आपण सदैव जागृत राहिले पाहिजे.
स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते (स्वराज्य ) मी मिळविणारच! अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली होती. याची जाणीव सदैव जागृत राहिली पाहिजे." असे ओजस्वी विचार सरस्वती मंदिर संस्थेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. मोहन दाते यांनी व्यक्त केले.
"विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात जाऊन तसेच इंटरनेटच्या माध्यमातून थोर महापुरुषांच्या चरित्राविषयी जाणून घेतले पाहिजे. थोर महापुरूषांचे आदर्श तत्वज्ञान आपल्या व्यक्तिमत्त्वात संवर्धित व्हावेत यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे." असे विचार सरस्वती मंदिर संस्थेच्या सचिव सौ प्रीती चिलजवार यांनी व्यक्त केले.
सहशिक्षिका सौ.रोहिणी कुलकर्णी यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचे विविध संदर्भ व दाखले देणारी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
प्रशालेतील सहशिक्षिका सौ. सुमित्रा भगत यांनी प्रमुख अतिथींचा परिचय उपस्थितांना करून दिला .
सरस्वती मंदिर संस्थेचे खजिनदार श्री.सुधीर देव यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सरस्वतीची प्रतिमा देऊन प्रमुख अतिथींचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील सहशिक्षिका सौ.गौरी मठपती यांनी केले.
बातमीलेखन -श्री मुकुंद गिरी
स. हि. ने च्या बागेत कमळ व कुमुद लागवड
दि12/2/2024 रोजी श्री सरस्वती मंंदिर संस्थेच्या सदस्या सौ रेवती कुलकर्णी मॅडम यांनी स. हि. ने प्रशालेतील बागेत Thousand Petal, Pink cloud, Rose pink हे कमळाचे कंद स्वहस्ते लावले आहेत.तसेच Bulls eye(लाल) ,Siwanan,Lincy wood(जांभळा)(Ranicolour) हे कुमुद ही लावले. कमळ व कुमुद लावण्यासाठीआवश्यक 50 किलो शेणखत सौ रेवती कुलकर्णी यांनी दिले आहे
सौ रेवती कुलकर्णी मॅडम यांनी ज्ञानाचे प्रतिक कमळ रोप भेट दिल्याबद्दल प्रशालेच्या वतीने आभार
तसेच दि 23/7/2024 रोजी मैदानावरील सिमेंटच्या कुंड्यात हरित सेनेतील विद्यार्थ्यांसमवेत सौ रेवती कुलकर्णी व सौ संगीता रेळेकर यांनी waterlily Innocence.(white),Sassimonthon (Yellow) ,Star of siam, (Red),Attrance night bloomer(गुलाबी),Key largo ,Prolifera (Night bloomer) ,Bulls eye,Siwanan(लाल) ,Lincy wood(Ranicolour) हे कुमुद लावले.
हरीत सेनेतील विद्यार्थी या रोपांची वाढ, स्वच्छता, सुरक्षा याबाबत काळजी घेतात.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री.रघुनाथ दामले व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ नीता येरमाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
श्री आण्णा बाळगे व राहुल गायकवाड यांचे सहकार्य मिळाले.
श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित स. हि .ने .प्रशालेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
सोलापूर दि.20 शनिवार श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित स.हि.ने प्रशालेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका खिलारे केशर यांनी केले तीन लोकनो खंड मे गुरु से बडा ना कोई अशी माहिती सांगितली.
कार्यक्रमास उपस्थित असलेले संस्थेचे सदस्य श्री प्रमोद कामतकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नीता येरमाळकर,पर्यवेक्षक श्री दिलीप राठोड यांच्या हस्ते व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गुरूं बद्दलचे प्रेम ,आदर आपल्या भाषणातून व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी भाषणाची अतिशय उत्तम तयारी केलेली होती.
प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.सुहासिनी गायकवाड गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमा...महर्षी व्यास भारतीय संस्कृतीचे शिल्पकार व मूलाधार मानले जातात. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्यांना मानतात त्यात संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घे तू असे म्हणून ज्ञानेश्वरी लिहिण्यास सुरुवात केली असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले .
या कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.
दि.18 श्री. सरस्वती मंदिर संस्था संचालित स. हि. ने. प्रशालेत शालांत परीक्षा 2023-24 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या समारंभासाठी डॉ. छाया रघोजी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच श्री.नंदकुमार रघोजी, संस्थेचे अध्यक्ष अॅड. रघुनाथ दामले, सचिवा सौ. प्रिति चिलजवार, खजिनदार श्री. सुधीर देव, सदस्य श्री. शिरीष कुलकर्णी, सौ.रेवती कुलकर्णी, श्री.किशोर चंडक ,मुख्याध्यापिका सौ. नीता येरमाळकर, पर्यवेक्षक श्री. दिलीप राठोड, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
प्रशालेचे संगीत विभाग प्रमुख श्री. कोथळीकर सर व त्यांच्या बालचमूंनी स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता येरमाळकर यांनी केले. प्रशालेचा शतक महोत्सवी वर्षात शंभर टक्के निकाल लागला. त्यामुळे हा क्षण म्हणजे सोनेरी क्षण आहे. असे सांगून या क्षणासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अतिथींनी आपल्या मनोगतातून ज्ञानाचे महत्त्व सांगितले. तसेच स्त्री शिक्षणाचा वसा घेतलेल्या सरस्वती मंदिर संस्थेचे कौतुक केले. शिक्षणासाठी केवळ पैसाच आवश्यक नसून जिद्द, चिकाटी महत्वाकांक्षा असणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या कृतीतून, शिकवणीतून कौशल्यांचा विकास होतो. योग्य आहार, आवश्यक व्यायामाचा समावेश आपल्या जीवनात करावा. शाळा, शहर, देश, जग अशा विविध स्तरातील आणि स्वानुभवातून आलेले अनेक उदाहरणे देऊन अगदी सहज सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
सदस्य श्री. शिरीष कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात नावलौकिक मिळवावे, असे सांगून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लागले.
गजर विठूचा.....
मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित ... स. हि. ने. प्रशालेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी सोहळा तसेच गजर विठूचा हा भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विठूचा गजर या कार्यक्रमास प्रख्यात गायक व वादक श्री. रंजन पंचवाडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. रघुनाथ दामले, सचिवा सौ. प्रीती चिलजवार, खजिनदार श्री सुधीर देव प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ नीता येरमाळकर, पर्यवेक्षक श्री राठोड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. देहू, आळंदी, पैठण अशा अनेक ठिकाणाहून वारकरी जवळपास 260 किलोमीटरचे अंतर पायी चालत पंढरपुरात येतात. अशी माहिती सहशिक्षिका विद्या माने यांनी आपल्या प्रास्ताविकेतून विद्यार्थ्यांना दिली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विठूमाऊली च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रमुख अतिथींचा परिचय रोहिणी कुलकर्णी यांनी करून दिला.
संस्थेच्या सचिव सौ. प्रिति चिलजवार आणि खजिनदार श्री सुधीर देव यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा शाल, पुष्पगुच्छ व सरस्वती प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
विठूचा गजर
प्रशालेचे संगीत विभाग प्रमुख संतोष कोथळीकर आणि विद्यार्थी यांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या भक्ती गीतांचे सादरीकरण केले. यामध्ये.. चंद्रभागेच्या तिरी... विठ्ठल नामाची शाळा...कानडा राजा पंढरीचा...माझे माहेर पंढरी.. खेळ मांडीयेला... जैसे ज्याचे कर्म.. धरीला पंढरीचा चोर... धनी मलाही दाखवाना पंढरी .. जाऊ देरे मला... हेचि दान देगा या सुंदर गीतांचा समावेश होता. या कार्यक्रमात दूर्वा महिंद्रकरचे खेळ मांडीयेला वाळवंटी घाई या गीता बरोबरचे नृत्य सर्वांना भावून गेले.
प्रमुख अतिथी रंजन पंचवाडकर यांनी आपल्या मनोगतात संगीत विभाग प्रमुख संतोष कोथळीकर आणि विद्यार्थी चमूचे भरभरून कौतुक केले. प्रशालेत सादर झालेला कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हुतात्मा स्मृती मंदिरात पहायला मिळावा अशी आशा व्यक्त करून संगीत विभागास शुभेच्छा दिल्या.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता येरमाळकर यांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संगीत विभाग प्रमुख, संगीत विद्यार्थीचमू यांचे भेटवस्तू देऊन कौतुक केले. कार्यक्रमात सहभागी असलेल्या शिक्षकांचेही कौतुक केले आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.
वारकरी दिंडीचे उद्घाटन सरस्वती मंदिर संस्थेच्या सचिव सौ प्रिति चिलजवार यांच्या हस्ते झाले.
विठोबा, रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, मुक्ताई यांची वेशभूषा सुंदर होती.
दिंडीमध्ये 80 विद्यार्थी सहभागी झाले होते. अतिशय उत्साहात भगव्या पताका फडकवत दिंडी पार पडली.
सोलापूर दि.२१ जून :
" शरीर व मनाची सुदृढता टिकवून निरामय जीवनशैली अंगीकारण्यासाठी योगासने उपयुक्त ठरतात." असे विचार योग शिक्षक आणि आजचे मार्गदर्शक क्रांतीवीर महिंद्रकर यांनी व्यक्त केले.
" शरीर संवर्धनाची आरोग्यदायी सवय म्हणून योगासनांचे महत्व अनन्यसाधारण आहे. ज्ञानेंद्रियांच्या सक्षमतेसाठी, योगाभ्यास निश्चितच उपयुक्त आहे." असे विचार प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता येरमाळकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले.
"नियमित योगासने केल्याने प्रतिकार क्षमता वाढून अनेक दुर्धर आजारांना प्रतिबंध करता येतो." असे प्रतिपादन योगशिक्षिका शकुंतला हिप्परगी यांनी केले.जागतिक योग दिनास सरस्वती मंदिर संस्थेचे सदस्य प्रमोद कामतकर, मुख्याध्यापिका नीता येरमाळकर, पर्यवेक्षक दिलीप राठोड, तसेच विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
ॐ संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम् देवा भांगं यथा पूर्वे सत्र्ञ्जानाना उपासते ।। या प्रार्थनेने योगासनांच्या सादरीकरणास सुरुवात झाली.ताडासन, वृक्षासन , पादहस्तासन ,शशांकासन अर्धचक्रासन , भद्रासन , वक्रासन, अर्धमच्छिंद्रासन ,गोमुखासन,वज्रासन , उष्ट्रासन , कपालभाती, भ्रामरी प्राणायाम आदी योगासनांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन याप्रसंगी करण्यात आले. योग शिक्षिका शकुंतला हिप्परगे यांनी जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून योगासनांचा सराव करून घेतला.
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।। या सामूहिक शांतिपाठाने योग दिनाचा समारोप झाला.
स.हि.ने प्रशालेत पुष्पवृष्टी सह शैक्षणिक प्रवेशोत्सव व पुस्तक वाटप सोहळा संपन्न
सोलापूर दि.15 जून - सरस्वती मंदिर संस्था संचालित स.हि.ने. प्रशालेत नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ विद्यार्थ्यांचे स्वागत करून मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
नवागत विद्यार्थ्यांचा रंगीबेरंगी फुग्यांच्या आकर्षक कमानीतून झालेला प्रवेश आणि त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेले छुटकी, छोटू, मोटू, मिकी माऊस, डोरेमॉन हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. चाॅकलेट व गुलाब पुष्प देऊन झालेले स्वागत यामुळे विद्यार्थ्यांनी सुखद आनंद अनुभवला.
गुलाब पाकळ्यांच्या पायघड्या , फुगे, कार्टून ,बालगीते ,शाळेत उपस्थित राहिलेला डोरेमॉन आणि मिकी माऊस बरोबर विद्यार्थ्यांचा जल्लोष असे मौजमजेचे रंग भरल्याने वातावरण अधिकच उत्साहवर्धक झाले .
सुसज्ज इमारत, प्रशस्त वर्ग खोल्या , डिजीटल बोर्ड, संगणक कक्ष, संगीत कक्ष, चित्रकला भवन, ग्रंथालय, प्रशस्त प्रांगण अशा सर्व सोयींनी परिपूर्ण असलेल्या शाळेची वैशिष्ट्ये सांगण्यात आली.
प्रवेशोत्सवाच्या मनोहारी सोहळ्यानंतर इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांना शालेय क्रमिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांना भाषा, गणित आणि विज्ञान या विषयांच्या शैक्षणिक साहित्याची ओळख करून देण्यात आली.
या कार्यक्रमास सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री रघुनाथ दामले सचिव सौ प्रिति चिलजवार तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ नीता येरमाळकर , पर्यवेक्षक श्रीदिलीप राठोड , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षेत सकुबाई हिराचंद नेमचंद प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला.
परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणार्या गुणवंत विद्यार्थ्यांना सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष अॅड.श्री.रघुनाथ दामले, सचिव सौ.प्रिती चिलजवार व मुख्याध्यापिका सौ.नीता येरमाळकर पर्यवेक्षक श्री दिलीप राठोड यांनी विद्यार्थ्यांना पेढा भरवून व गुलाबपुष्प देऊन कौतुक केले.
परीक्षेत प्रविष्ट झालेल्या एकूण 67 विद्यार्थ्यांपैकी उच्च श्रेणीमध्ये 20, प्रथम श्रेणी मध्ये 24 व द्वितीय श्रेणीत 14 तर पास श्रेणीत 09 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रशालेतून कु.सुलाखे प्रणिती आनंद व कु. कळंब सई दत्तात्रय हिने (93.80%) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक संपादन केला. तर कु.परदेशी मेघना शितलसिंग (89.40%) द्वितीय व चि. गुडूप अथर्व गौरीशंकर ( 88.00%) याने तृतीय क्रमांक संपादन केला. उत्कृष्ट निकालाची परंपरा जतन करण्यासाठी- विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती,ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा सुयोग्य वापर,सराव परीक्षा,होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य संस्थेचे अध्यक्ष श्री रघुनाथ दामले, सचिव सौ प्रिती चिलजवार, सदस्य श्री शिरीष कुलकर्णी, सौ रेवती कुलकर्णी यांनी विशेष मार्गदर्शन केले होते.
श्री.सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष अॅड.श्री.रघुनाथ दामले, सचिव सौ.प्रीति चिलजवार, खजिनदार श्री. सुधीर देव व कार्यकारी मंडळातील सर्व सदस्यांनी प्रशालेच्या उज्ज्वल यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, पालक व मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले.
आजच्या कौतुक सोहळ्याचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ सुमित्रा भगत यांनी केले.सौ संगीता रेळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
At our school, we are committed to providing a quality education that prepares our students for success in their future endeavors. Our experienced and dedicated staff work tirelessly to create a safe and supportive learning environment where students can thrive both academically and personally. We offer a wide range of programmes and extracurricular activities to help students explore their interests and develop their skills. We believe that every student has the potential to achieve great things, and we are here to help them reach their goals.
Join us for our annual Fall Festival on Saturday, October 23rd! There will be games, food, and fun for the whole family. Don't miss it!
Copyright © 2024 SARASWATI MANDIR SANSTHA - All Rights Reserved.
Powered by VIDYA COMPUTERS, SOLAPUR- 9422066287
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.