
Welcome
Unleashing Your Potential
Inspiring students to discover their passions and achieve their dreams.
Inspiring students to discover their passions and achieve their dreams.
संस्थेला स्वतःची मोठी इमारत हवी होती. शेठ हिराचंद नेमचंद जोशी यांनी 1930 मध्ये हे संस्थेला देणगी दिली. त्यामुळे संस्थेची पहिली इमारत बांधून पूर्ण झाली. आणि सखुबाई हिराचंद नेमचंद कन्या प्रशाला असे नाव शेठजींच्या इच्छेनुसार देण्यात आले.
प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलींच्या पुढील शिक्षणाची सोय व्हावी म्हणून 1935 मध्ये मुलींचे हायस्कूल काढण्यात आले. 1934 साली लहान बालकांच्या शिक्षणाचा प्रयोग याच शाळेने प्रथम केला. हा बालवर्ग उत्तम चाले. 1965 मध्ये बाल वर्गाचे रूपांतर पूर्व प्राथमिक वर्गामध्ये करण्यात आले तसेच संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात स्त्रियांसाठी एक वर्षाचा अभ्यासक्रम असलेला शिवण वर्ग चालू करण्यात आला. अशाप्रकारे श्री सरस्वती मंदिर च्या पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि शिवण वर्ग अशा चार शाखा कार्यान्वित झाल्या. व्यक्तिमत्व उन्नतीसाठी स्त्री व्यक्तिमत्व विकास केंद्र या पाचव्या शाखेची भर पडली.
रामसुख संतोकीराम चंडक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून आलेल्या पंचवीस हजार रुपयाच्या देणगीतून तीन ते पाच वर्षे वयाच्य मुला मुलींकरिता एक जुलै 1965 रोजी सरस्वती मंदिर संस्थेच्या शाळेत जोडून जडावबाई रामसुख चांडक बालक मंदिर चालू करण्यात आले.
स्त्री विकासाचा ध्यास घेणारी श्री सरस्वती मंदिर ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची शैक्षणिक संस्था आहे.
पुरोगामी समजला जाणारा दूरदृष्टीचा विचार शंभर वर्षापूर्वी सोलापुरातील सुधारकांना सुचला. आणि त्याची परिणती म्हणून 27 सप्टेंबर 1895 रोजी श्री सरस्वती मंदिर ही संस्था स्थापन झाली.
श्री बालाजी भास्कर जोशी आणि सौ रमाबाई जोशी हे पती-पत्नी मंदिरात राहणाऱ्या विद्यार्थिनींची सर्व व्यवस्था पहात आणि त्यांना शिकवित.
मुलींच्या शिक्षणाबाबत समाजाचे अनुकूल मत व्हावे.यासाठी मंदिर च्या कार्यकर्त्यांनी मुलींच्या भोजनाची आणि निवासाची ची सोय केली होती.
मराठी चौथीपर्यंत अभ्यासक्रम त्यांना शिकवण्यात येई. शाळेखेरीज संस्थेमध्ये वाचनालय चालविले जाई. जिल्हा वाचनालयातून पुस्तके वर्तमानपत्रे व मासिके मंदिरातील स्त्री सभासदांकरीता करता मुद्दाम आणीत असत.
पुढे स्वतःचे वाचनालय पुस्तके खरेदी करून चालू करण्यात आले. प्रौढ व विवाहित स्त्रियांना घर कामामुळे वेळच्या वेळी शाळेत जाता येत नसे म्हणून त्यांच्यासाठी अनियमित वर्गाची सुविधा करुन त्यांना त्यांच्या सोयीनुसार अभ्यासक्रमापैकी भाषा गणित इतिहास इत्यादी विषय मंदिरात शिकवण्यात येत. याव्यतिरिक्त शिवणकाम, विणकाम, पेटी वादन वगैरेचे वर्गही चालविले जात होते. मंदिर मध्ये दाईचा कोर्सही सुरू करण्यात आला होता. स्त्रियांना व मुलींना उपयुक्त अशा विषयांवरची व्याख्याने आयोजित करण्यात येत असत. व्याख्याते म्हणून विद्वानांना पाचारण करण्यात येत असे. वटसावित्री, संक्रांत नागपंचमी या दिवशी काही कार्यक्रम व हळदीकुंकू होत असे. संक्रांतीला हलव्याचे आणि कला कौशल्याचे प्रदर्शन केले जाई. समारंभास सोलापुरातील स्त्रिया बहुसंख्येने उपस्थित असत स्त्रियांसाठी सामाजिक कार्य करणारी संस्था या नावाला पात्र असे मंदिराचे कार्य सुरु झाले होते.
संवाद साधणे, गोष्टी सांगणे, माहिती सांगणे, हातांनी काम करणे, ज्ञानेंद्रियांना अनुभव देणे, भाषेचा योग्य व करणे, खेळणे, गाणी म्हणणे, नाचणे इत्यादी विविध कृतींचे आयोजन केले जाते. विविध स्पर्धातून भाग घेता यावा आणि सभाधीटपणा यावा यासाठी वक्तृत्व, पाठांतर, खेळ, चित्रकला या क्षेत्रातही विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. त्यांच्या अंगच्या गुणांच्या आविष्कारास संधी मिळावी म्हणून सण-उत्सव दिन विशेष साजरे केले जातात. दरवर्षी एखाद्या प्रेक्षणीय- स्थळी त्यांची सहल काढली जाते. खेळांचे आयोजन केले जाते. मातकाम, कागदकाम, जीवनव्यवहार यांची प्रात्यक्षिके घेतली जातात.
इ.स. 1920 पासून सुरु झालेल्या कन्या शाळेतील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी दर्जेदार अध्यापनाबरोबरच इतरही अनेक उपक्रम येथे केले जातात. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, गणित परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, चित्र रंगवण्याचा स्पर्धेस मार्गदर्शन, हस्ताक्षर सुधारणे, लोकनृत्य असे अनेकविध उपक्रम चालू असतातच. राष्ट्रीय उत्सव, दिनविशेषही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
'प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः' - हे ब्रीद सार्थ करण्याचा प्रयत्न गेल्या 124 वर्षापासून सरस्वती मंदिर संस्थेने अविरतपणे केला आहे.
सकुबाई हिराचंद नेमचंद प्रशाला (1920), लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळा (1925), जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिर (1965), सरस्वती मंदिर शिवण वर्ग (1970), स्त्री व्यक्तिमत्व विकास केंद्र (1994) असा सरस्वती मंदिर संस्थेचा शाखाविस्तार आहे
अध्ययन-अध्यापन अधिक सजग करणाऱ्या प्रशस्त वर्गखोल्या, विविध साहित्यसंपदेने समृद्ध असणारे ग्रंथालय, विविध भौतिक साधन सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांचे शारीरिक सुदृढता निर्माण करण्याबरोबरच विवि खेळांचे प्रात्यक्षिक देण्यासाठी प्रशस्त क्रीडांगण, मनोहरी व सदोदित नटलेले कलादालन, स्वरसाधनेचा यशस्वी आनंद देणारा संगीत कक्ष, आधुनिकता संवर्धित करणारा परिपूर्ण संगणक कक्ष, नव्या तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण प्रक्रिया सहजसोपी करणारी आनंददायी डिजिटल क्लासरूम, विद्युत निर्मिती करणारा सौर उर्जा प्रकल्प शैक्षणिक समृद्धी निर्माण करण्याच्या प्रयासाची साक्ष देतात. वक्तृत्व कथाकथन वाद-विवाद निबंध एकांकिका नाट्य समूहगीत विविध नृत्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा घोषवाक्य व सुविचार स्पर्धा मेहंदी स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजुषा, बैठे खेळ व मैदानी खेळ स्पर्धा वर्ग सजावट स्पर्धा यासारख्या स्पर्धाचे आयोजन केले जाते. विविध सामाजिक संस्था व शासनाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमात व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. विविध स्पर्धामध्ये शाळेने नैपुण्य प्राप्त केले आहे. पालक शिक्षक संघाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कृती शाळा व वासंतिक छंद वर्गाचे आयोजनही करण्यात येते.शिष्यवृत्ती परीक्षा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत व इंग्लिश परीक्षा, राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्यातर्फे आयोजित हिंदी परीक्षा, संस्कृती ज्ञान परीक्षा, गणित प्राविण्य परीक्षा ज्ञान प्राविण्य परीक्षा सामान्य जान परीक्षा विविध थोर पुरुषांच्या जीवन चरित्रावर आधारित परीक्षा, एम.टी.एस., एन.टी.एस, एन.एम.एम.एस. या व इतर परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते.
गो. वि. दांडेकर, जगदीश खेबुडकर, ग. दि. माडगूळकर द. मा. मिरासदार, प्रा. शिवाजीराव भोसले ,भा.भा. उदगावकर (साहित्यिक), वि. गो. कुलकर्णी (माजी संचालक, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई) डॉ. मोदी (नेत्रतज्ज्ञ जयंत नारळीकर व दा. कृ. सोमण (खगोलशास्त्रज्ज्ञ) वा. ना. दांडेकर, वि. वि. चिपळूणकर व प्राचार्य राम शेवाळकर (शिक्षण तज्ज्ञ) यामान्यवरांनी संस्थेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन गुणवत्तेच्या आलेख उंचावण्याचे लौकिकास्पद कार्य केले आहे. श्री सरस्वती मंदिर ही संस्था स्थापन करणारे, ती नावारूपास यावी म्हणून सदैव धडपडणारे, संस्थेस आर्थिक सहाय्य करणारे व या ना त्या कारणाने संस्थेशी संबंधित असलेल्या सर्वाच्या प्रयत्नामुळे, त्याग व सहकार्यामुळे संस्था शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल केली आहे. याची संस्थेस जाणीव आहे. त्या सर्वाच्या ऋणातच राहणे योग्य होईल.भविष्यात विविध व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास, अभ्यास केंद्र, ज्ञान संवर्धन, विविध कौशल्यांचे संवर्धन, संगणक प्रशिक्षण, विविध भाषांचे वर्ग यासाठी गरजेनुसार व्याख्याने, कार्यशाळा, शैक्षणिक फिल्म्स, डॉक्युमेंटरीज, प्रत्यक्ष कार्यानुभव, इत्यादी माध्यमांचा उपयोग केला जाईल. भविष्यात शैक्षणिक कार्याचा विस्तार व गुणवत्ता यांचा साकल्याने विचार करण्यात येईल. ज्यायोगे आदर्श व गुणवंत विद्यार्थी व त्यातून समृद्ध समाज निर्मिती करण्यास प्राधान्य देण्यात येईल.
We are excited to be accepting applications for the upcoming session! Download our application and attach it to this form. We look forward to hearing from you!
175, Gold Finch Peth, Navi Peth, Budhavar Peth, Solapur, Maharashtra, India, 413007
Kami menggunakan cookie untuk menganalisis lalu lintas situs web dan mengoptimalkan pengalaman situs web Anda. Dengan menerima penggunaan cookie, data Anda akan dikumpulkan bersama data pengguna lainnya.